एटापल्ली तालुक्यातील चार मतदान केंद्रांवर उद्या मतदान


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गडचिरोली :
नक्षली कारवायांमुळे मतदान होऊ न शकलेल्या एटापल्ली तालुक्यातील चार मतदान केंद्रांवर उद्या १५ एप्रिल रोजी फेरमतदान होणार आहे. गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघातल्या एटापल्ली तालुक्यातील चार मतदान केंद्रांवर  मतदान घेण्याचे आदेश निवडणूक आयोगाने दिले आहेत.
एटापल्ली तालुक्यातील वटेली, गर्देवाडा, पुस्कोटी व वांगेतुरी या गावांचे पुन्हा मतदान घेण्यात येणार असून, उद्या १५ एप्रिल रोजी सकाळी ७ ते दुपारी ३ या वेळेत मतदान प्रक्रिया घेण्यात येणार आहे. चारही ठिकाणचे मतदान गट्टा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत होणार आहे. १० एप्रिल रोजी नक्षलवाद्यांनी गट्टा गावाजवळ भूसुरुंगस्फोट घडविल्याने संबंधित मतदान केंद्रांपर्यंत निवडणूक पथक पोहचू शकले नाही. यामुळे चारही ठिकाणी मतदान झाले नव्हते.  



  Print






News - Gadchiroli | Posted : 2019-04-14






Related Photos