महत्वाच्या बातम्या

 कोंढाळा जवळ झालेल्या भीषण अपघातात १ जागीच ठार तर १ गंभीर जखमी -


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / देसाईगंज : प्राप्त झालेल्या माहितीनुसार कोंढाळा जवळ बैलबंडी आणि ट्रकच्या अपघातात मुलगा ठार झाल्याची  माहिती मिळालेली आहे. सविस्तर वृत्त असे आहे की, आरमोरी आणि देसाईगंज मार्गावरील कोंढाळा गावाजवळ रात्रौ ७.३०वाजता गटार साफ करणाऱ्या ट्रक शेताकडून येत असलेल्या बैलबंडीला लोकमान्य टिळक महाविद्यालय जवळ मागेहून जबर धडक दिली त्या धडकेत वडील श्रीकृष्ण माणिक वाढई हे गंभीर जखमी तर मुलगा रोशन माणिक वाढई वय २० जागीच ठार झाला. घटनास्थळी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त लागलेला असून जखमी वडीलाला तात्काळ देसाईगंज रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. नागरिकांचा राग अनावर झाल्याने सदर संतप्त जमावाने अपघात करणाऱ्या ट्रकला नागरिकांनी पेटवून दिले. घटनास्थळी मोठ्या प्रमाणात लोकांची तोबा गर्दी जमलेली होती. तरूण युवकाचा घडलेल्या घटनेत मृत्यु झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. पुढील तपास देसाईगंज पोलीस करत आहेत.





  Print






News - Gadchiroli




Related Photos