महत्वाच्या बातम्या

 १ ऑगस्टला महसूल दिन : १ ते ७ ऑगस्ट या कालावधीत महसूल सप्ताह राबविण्यात येणार


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / नागपूर : दरवर्षी प्रमाणे यावर्षी १ ऑगस्ट रोजी महसूल दिन साजरा करण्यात येत आहे. त्यासोबतच १ ते ७ ऑगस्ट या कालावधीत महसूल सप्ताह राबविण्यात येत आहे, असे अपर जिल्हाधिकारी आशा पठाण यांनी सांगितले.

१ ऑगस्ट रोजी महसूल अधिकारी व कर्मचारी यांचा उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल सत्कार, २ ऑगस्ट रोजी युवा संवाद, ३ ऑगस्ट रोजी एक हात मदतीचा उपक्रम-या कार्यक्रमात अतिवृष्टी, पूर, नैसर्गिक आपत्तीमध्ये सापडलेल्यांना मदत देण्यात येणार आहे. ४ ऑगस्ट रोजी जनसंवाद कार्यक्रमात अपील निकाली काढण्यात येतील. सलोखा योजनेबाबत कार्यवाही. आपले सरकार पोर्टलवरील प्रकरण निकाली काढणे. ५ ऑगस्ट रोजी महसूल अदालतील अतिदुर्गम भागातील नागरिकांचे प्रश्न निकाली काढण्यात येतील. तसेच विद्यार्थ्यांचे दाखले, प्रमाणपत्राचे वितरण करण्यात येणार आहे. ६ ऑगस्ट रोजी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयामार्फत विरमाता व विरपत्नी तसेच माजी सैनिक यांचे महसूल विषय प्रश्नांवर कार्यवाही, ७ ऑगस्ट रोजी समारोपीय कार्यक्रमात सप्ताहात केलेल्या कार्याचे सादरीकरण करण्यात येणार आहे.  या कालावधीत प्रत्येक विभागाने आपल्याशी संबधित काम निकाली काढून झिरो पेंडन्सी करावी, असेही त्यांनी सांगितले.

या बैठकीस निवासी उपजिल्हाधिकारी सुभाष चौधरी, उपजिल्हाधिकारी पियुष चिवंडे, समाज कल्याण अधिकारी अंजली चिवंडे तसेच संबंधित अधिकारी उपस्थित होते.  





  Print






News - Nagpur




Related Photos