देलोडातील नागरीक करत आहेत भिषण पाणीटंचाईचा सामना


- नळयोजना निष्क्रीय, उपाययोजना करण्याची नागरीकांची मागणी
विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
तालुका प्रतिनिधी / आरमोरी :
तालुक्यातील देलोडा बुज येथे भिषण पाणीटंचाईचा सामना करावा लागत असून एकमेव असलेल्या हातपंपावर पाण्यासाठी नागरीक पहाटेपासूनच गर्दी करीत असल्याचेे दिसून येत आहे. तब्बल एक किमी अंतरावरून पिण्याचे पाणी आणावे लागत आहे.
सध्या उन्हाचा कडाका वाढला आहे. पाण्याची अत्यंत आवश्यकता असतानाच देलोडा बुज येथील नागरीक पाण्यासाठी आटापिटा करताना दिसून येत आहेत. गावात पिण्याच्या पाण्यासाठी एकमेव हातपंप आहे. यामुळे महिला, पुरूष, बालके सर्वच या हातपंपावर गर्दी करीत आहेत. कोणी कावडीने, कुणी सायकलने तर कुणी डोक्यावर दोन दोन गुंड पाणी घेवून जातानाचे दृश्य पहावयास मिळत आहे. ऐन उन्हाळ्याच्या दिवसातच नळयोजना निष्क्रीय असल्यामुळे नागरीक पाण्यासाठी भटकंती करीत आहेत. नागरीक इतर काम सोडून हातपंपावर आपला नंबर लागण्याची वाट पाहत आहेत. यामुळे गावात पिण्याच्या पाण्याची व्यवस्था प्रशासनाने करावी, अशी मागणी केली जात आहे.

   Print


News - Gadchiroli | Posted : 2019-04-14


Related Photos