महत्वाच्या बातम्या

  जि.प.माजी अध्यक्ष अजय कंकडालवार यांच्या हस्ते ग्राम पंचायत उमानूर येथे विकास कामांचे भूमिपूजन


- ग्राम पंचायत अतंर्गत सुध्दागुड्म, जोगनगुडा, सिलमपली येते आवराभिंत,मोरी बांधकाम

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / अहेरी : तालुक्यातील ग्राम पंचायत उमानूर ग्राम पंचायत अतंर्गत येत असलेल्या सुध्दागुड्म, जोगनगुडा, सिलमपली येते शाळेत संरक्षण भिंत व आवश्यक ठिकाणी मोरी बांधकामाचे भूमिपूजन जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अजय कंकडालवार यांच्या हस्ते करण्यात आले आहे. अनेक दिवसांपासून यासाठी मागण्या रेटून धरला असता जि.प.अध्यक्ष असताना जिल्हा परिषदेच्या १५ व्या वित्त योजने अंतर्गत मंजुरी देऊन सदर कामाचे भूमिपूजन केले आहेत.या भूमिपूजन सोहळ्याला अहेरी पंचायत समितीचे माजी सभापती भास्कर तलांडे, माजी सभापती सुरेख आलाम, माजी जि.प.सदस्य, अजय नैताम, उमानूरचे माजी सरपंचा ताराबाई आसाम, शामराव गावडे, लक्ष्मीस्वामी अठेला, राजारामचे माजी उपसरपंच संजय पोरतेट, जयराम आत्राम, संदीप आत्राम, नामदेव पेंदाम,नरेंद्र गरगम, दिपक अर्का, इरसाद शेख, व नागरिक उपस्थित होते. 





  Print






News - Gadchiroli




Related Photos