महत्वाच्या बातम्या

 आरसेटी संस्था द्वारा निशुल्क प्रशिक्षणाचे आयोजन


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / भंडारा : महाराष्ट्र  शासन व बॅक ऑफ इंडिया प्रायेाजित स्टार स्वयं रोजगार प्रशिक्षण संस्था (आरसेटी संस्थेद्वारा) निशुल्क प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले आहे. १ ऑगस्टपासून ३० दिवसीय प्रशिक्षण सुरु होत आहे. या प्रशिक्षणामध्ये पोट्रेट DSLR कॅमेरा फोटो शुटींग, फोटो स्टुडिओचे वव्यवस्थापन, फ्लॅश फोटोग्राफी, विडीओ एडिटींग ॲन्ड ऑडियो डबिंग, इवेन्ट शुटींग कलर बॅलेन्स एक्सपोजर व न्युज फोटोग्राफी, कर्ज विषयक मार्गदर्शन, उद्योजकीय कौशल्य, व्यक्तीमत्व विकास, प्रकल्प अहवाल, व्यवसायची संधी, बाजार सर्वेक्षण, बँकेच्या योजना या बद्दल मार्गदर्शन दिले जाईल. तसेच प्रशिक्षण प्रवेशाकरिता आयोजित मुलाखतीकरिता येतांना उमेदवारांनी शाळा सोडल्याचा दाखला, गुणपत्रिका, रेशनकार्ड, आधार कार्ड, मनरेगा कार्ड, सोबत आणणे आवश्यक आहे. 

सदर प्रशिक्षणामध्ये प्रशिक्षणार्थ्यांना जेवन, चहा, नाश्ता, रहाणे इत्यादीचा सोय मोफत केली जाईल. स्वयरोजगारांची आवड, व्यवसाय करण्याची तयारी असणारे वय १८ ते ४५ वयोगटातील तसेच शिक्षण दहावी पास किंवा नापास अशा बेरोजगार पुरुष व महिलांनी मुलाखतीकरिता १ ऑगस्ट २०२३ ला सकाळी दहा वाजता बि.ओ.आई. स्टार स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्था आरसेटी इमारत, लालबहादूर शास्त्री मनरो शाळेच्या मागे शास्त्री चौक, बाजुला कार्यालयीन वेळेत उपस्थित रहावे, असे आवाहन बि.ओ.आई आरसेटी कार्यालयानी कळविले आहे.





  Print






News - Bhandara




Related Photos