मांडवाला लागलेल्या आगीत बालकाचा होरपळून मृत्यू, वडील गंभीर जखमी


- पलसपूर येथील घटना
विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी/ गडचिरोली  : 
 दिव्याचा भडका उडून घरासमोरील मांडवाला आग लागल्याने आगीत होरपळून सहा वर्षीय बालकाचा मृत्यू, तर वडील गंभीर जखमी झाले. सदर घटना  १२ एप्रिल रोजी  रात्री ७.४५ वाजताच्या सुमारास घोट जवळील   पलसपूर येथे घडली.
 राजीव शंकर दास (६) असे मृतक बालकाचे नाव आहे. शंकर मनोरंजन दास असे गंभीर जखमी झालेल्या वडीलाचे नाव आहे. काल शुक्रवारी रात्रीच्या सुमारास वादळवारा सुरू झाल्याने विद्युत पुरवठा खंडीत झाला.   त्यामुळे  शंकर दास यांनी घरासमोरील मांडवात दिवा लावला होता. वादळामुळे दिव्याचा भडका उडून मांडवाला आग लागली. या आगीत होरपळून राजीव या बालकाचा मृत्यू झाला, तर वडील गंभीर जखमी झाले.                       

   Print


News - Gadchiroli | Posted : 2019-04-13


Related Photos