नागपुरात अल्पवयीन मुलीवर बलात्काराचा प्रयत्न


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी /  नागपूर :
सातव्या वर्गात शिकत असलेल्या अल्पवयीन  विद्यार्थिनीला रस्त्यातून खेचून तिच्यावर बलात्काराचा प्रयत्न करण्यात आला. याप्रकरणी तीन अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  सदर  घटना एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील राज्य राखीव पोलीस बल (एसआरपीएफ) १५ क्रमांकाच्या बटालियनच्या पाठीमागील भागात गुरुवारी दुपारी घडली. 
 पीडित १३ वर्षीय मुलगी सातव्या वर्गात शिकत असून गुरुवारी आपल्या मैत्रिणीसह जात होती. त्या परिसरात झुडूपी जंगल आहे. तीन अज्ञात आरोपी पाठीमागून दुचाकीने आले व त्यांना आडवे झाले. त्यांनी दुचाकी आडवी लावली. तिघांनीही मिळून एका मुलीला पकडले व तिला झुडूपात खेचून नेले. दरम्यान, तिची मैत्रीण पळून घरी गेली. तिने पीडितेच्या भावाला घटनेची माहिती दिली. त्यांच्या येण्याची चाहूल लागताच आरोपी पीडितेला सोडून पळून गेले. त्यानंतर पीडित मुलगी व तिच्या भावाने पोलीस ठाण्यात बलात्काराचा प्रयत्न झाल्याची तक्रार दिली.  Print


News - Nagpur | Posted : 2019-04-13


Related Photos