ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पात वाघिणीची शिकार : चंद्रपूर जिल्यातील घटना


- तारेच्या फासामध्ये अडकून वाघिणीचा मृत्यू
विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी  / चंद्रपूर  :
जिल्यातील ताडोबा अंधारी  व्याघ्र प्रकल्पामधील कोर झोनमध्ये आज  सकाळी एक २ वर्षीय वाघीण मृतावस्थेत आढळली होती. घटनास्थळी वनविभागाचे अधिकारी दाखल होऊन तपासणी केली असता धक्कादायक प्रकार समोर आला आहे. शिकाऱ्यांनी लावलेल्या तारेच्या फाश्यात अडकून या वाघिणीचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले आहे.
ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातील कोर झोनमधील खातोडा गेट जवळील या पट्टेदार वाघिणीचा मृतदेह संशयास्पद अवस्थेत आढळला होता. वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी तपास केला असता शिकाऱ्यांनी लावलेल्या तारेच्या फाश्यामध्ये अडकून वाघिणीचा मृत्यू झाल्याचे सांगितले आहे. त्यामुळे ताडोबा व्याघ्र प्रकल्पाच्या कोर झोनमधे शिकारीचा प्रकार उघडकीस आल्याने एकच खळबळ उडाली आहे.

   Print


News - Chandrapur | Posted : 2019-04-13


Related Photos