पबजी गेमवरून मुंबई हायकोर्टाने केली पालकांची कानउघाडणी


वृत्तसंस्था / मुंबई : पालक आपल्या मुलांना महागडे मोबाइल फोन देतातच का?, पालकांनी आपले फोन पासवर्ड टाकून सुरक्षित ठेवायला हवेत असे म्हणत  पबजी गेमवरून मुंबई हायकोर्टाने पालकांची कानउघाडणी केली आहे. 
पबजी गेमने मुलांना वेड लावले आहे. यामुळे पालकांमध्ये चिंता आहे. या पार्श्वभूमीवर पबजी गेमविरोधात ११ वर्षीय मुलातर्फे आईने हायकोर्टात याचिका दाखल केली आहे. याचिकेतून पबजी गेमवर बंदी घालण्याची मागणी करण्यात आली आहे . या याचिकेवर हायकोर्टात आज सुनावणी झाली. केंद्र सरकारने याविषयी शहानिशा करून योग्य ते निर्देश जारी करावेत, अशी सूचना हायकोर्टाने केली. या याचिकेवरील सुनावणी जुलैपर्यंत तहकूब करण्यात आली आहे.   Print


News - Rajy | Posted : 2019-04-12


Related Photos