एटापल्ली तालुक्यातील 'त्या' चार मतदान केंद्रांवर होणार फेरमतदान


- निवडणूक अधिकाऱ्यांची घोषणा
विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गडचिरोली
:  काल ११ एप्रिल रोजी  पहिल्या टप्प्यातील मतदान सुरू असताना  गडचिरोली - चिमूर लोकसभा क्षेत्रातील  एटापल्ली तालुक्यातील वाघेझरी मतदान केंद्राजवळ   नक्षल्यांनी आयईडीचा स्फोट घडवून आणला. शिवाय  नक्षलवाद्यांनी गोळीबार केला. यात दोन जवान जखमी झाले.  यामुळं चार मतदान केंद्रावर मतदान पथके पोहचली नाहीत. या घटनांमुळे मतदान होऊ शकले नाही. या मुळे या चार मतदान केंद्रांवर फेरमतदान घेण्यात येणार आहे, अशी माहिती राज्याचे अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी दिलीप शिंदे यांनी दिली.
एटापल्ली तालुक्यातील गर्देवाडा येथील ३ मतदान केंद्र आणि वटेली या मतदान केंद्रांवर मतदान झाले नाही. यामुळे निवडणूक विभागाने या केंद्रांवर फेरमतदान करण्याचे जाहीर केले आहे. गट्टा येथे नक्षल्यांनी स्फोट घडवून आणल्याने मेढरी आणि जवेली हे मतदान केंद्र सेवारी नदी घाटाजवळ हलविण्यात आले होते. या दोन केंद्रावरील ९९३ मतदारांपैकी केवळ एकानेच मतदानाचा हक्क बजावला.   Print


News - Gadchiroli | Posted : 2019-04-12


Related Photos