महत्वाच्या बातम्या

 ओबीसी महामंडळाच्या योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / वर्धा : महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळाच्यावतीने इतर मागासवर्गीयांच्या कल्याण विकास व उन्नतीसाठी विविध कर्ज योजना राबविण्यात येत आहे. या योजनांचा ओबीसी प्रवर्गातील लाभार्थ्यांना लाभ घेण्याचे आवाहन ओबीसी महामंडळाच्यावतीने करण्यात आले आहे.

महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळाच्यावतीने राबविण्यात येत असलेल्या बीज भांडवल योजनेसाठी सन २०२३-२४ साठी जिल्ह्याला २७ लाख ४४ हजार रुपयाचे, वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजनेसाठी १ कोटी ३५ लाख ६६ हजार, शैक्षणिक कर्ज व्याज परतावा योजना १६ लाख ५० हजार, गट कर्ज व्याज परतावा योजनेसाठी ७० लाख ८५ हजार, महिला स्वयंसिध्दी व्याज परतावा योजनेसाठी १ कोटी ९५ लाख रुपयाचे आर्थिक उद्दिष्ट प्राप्त झाले आहे. योजनानिहाय लाभार्थ्यांचे उद्दिष्ट देखील प्राप्त झाले आहे.  

या योजना बँकेशी संबंधित आहे तर थेट कर्ज योजना १ लक्ष रुपयापर्यंतसाठी १ कोटी २० लाख रुपयाचे उद्दिष्ट प्राप्त झाले असून या योजनेंतर्गत महामंडळामार्फत थेट कर्ज पुरवठा करण्यात येते. तसेच कौशल्य विकास प्रशिक्षण योजनेसाठी ५६ लाख रुपयाचे उद्दिष्ट प्राप्त झाले असून योजनेंतर्गत लाभार्थ्यांना विविध प्रकारचे कौशल्य विकासाचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे, असे महाराष्ट्र राज्य  इतर मागासवर्गीय वित्त विकास महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक व्ही.एस. खोडे यांनी कळविले आहे.





  Print






News - Wardha




Related Photos