महत्वाच्या बातम्या

 वातानुकूलित ई-बसमध्ये रुग्णांना मिळणार सवलत : एसटी महामंडळाकडून प्रस्ताव


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

वृत्तसंस्था / मुंबई : एसटी प्रवासासाठी विविध घटकांना ३३ टक्क्यांपासून ते अगदी मोफत प्रवासाचीही सवलत देण्यात आली आहे. रुग्णांनाही विविध श्रेणीतील बसमध्ये सवलत असून, आता एसटी महामंडळात विजेवर धावणाऱ्या वातानुकूलित ई-बसमध्येही सवलत देण्यासाठी वाहतूक विभाग प्रस्ताव तयार करीत आहे.

साध्या आणि निमआराम श्रेणीतील हिरकणीसह आरामदायी शिवशाही बसमध्येही प्रवाशांना सवलत मिळते. सिकलसेल, एचआयव्ही, डायलेसिस आणि हिमोफेलिआ आजारांसाठी उपचार घेणाऱ्या प्रवाशांना केवळ साध्या आणि निमआराम श्रेणीतील बसमध्येच सवलत आहे. मात्र एसटी महामंडळात विजेवर धावणाऱ्या पाच हजार ३०० बस दाखल होणार आहे.

महिन्याभरात पहिली ई-बस दाखल होणार :

एसटी पुनरुज्जीवन आराखड्यानुसार बारा मीटरच्या दोन हजार ८०० आणि नऊ मीटरच्या दोन हजार ३५० ई-बस बांधणीसाठी एसटी महामंडळाने कंत्राटदार नियुक्त केला आहे. येत्या महिन्याभरात ताफ्यातील पहिली बस दाखल होणार आहे. या बसची चाचणी यशस्वी झाल्यानंतर ५० गाड्यांच्या टप्प्यासह २४ महिन्यात संपूर्ण ताफा महामंडळात दाखल होणार आहे.





  Print






News - Rajy




Related Photos