गडचिरोलीत सि ६० जवानांवर नक्षल्यांचा हल्ला : ३ जवान जखमी


 -एटापल्ली तालुक्यातील घटना 
विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गडचिरोली :
लोकसभा निवडणुकीसाठी पहिल्या टप्प्यातील मतदान संपल्यानंतर मतदान पथकाच्या सुरक्षेसाठी तैनात असलेल्या पोलिसांवर नक्षल्यांनी हल्ला केला. या हल्ल्यात तीन जवान जखमी झाले आहेत. एटापल्ली तालुक्यातील पुलसलगोदीच्या मतदान केंद्रावरुन बेस कॅम्पवर परतणाऱ्या नक्षलविरोधी सि ६० कमांडो पथकाला नक्षल्यांनी टार्गेट केलं.
नक्षल्यांनी पहिल्यांदा आयईडीची स्फोट घडवून आणला आणि त्यानंतर लागलीच कमांडो पथकावर अंदाधूंद  गोळीबार केला  यात तीन जवान गंभीर जखमी झाले. त्यामुळे या परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालं आहे. जवानांनी नक्षल्यांना जोरदार प्रत्युत्तर दिले. जखमी जवानांना हॅलिकॅाप्टरने नागपुरला रवाना करण्यात आले आहे. जवानांना घेण्यासाठी आलेल्या हॅलीकॅप्टरवरही माओवाद्यांनी गोळीबार केला. एटापल्ली तालुक्यातील पुलसलगोदी परिसरात घटना घडली. दरम्यान, नक्षल्यांनी सकाळी ११ च्या सुमारास कसनसूर पोलीस स्टेशनच्या हद्दीत येत असलेल्या वाघेझरी येथील मतदान केंद्रावर आईडीचा स्फोट घ़डवून आणला होता. दिवसभरातील हल्ल्याची ही दुसरी घटना आहे.  Print


News - Gadchiroli | Posted : 2019-04-11


Related Photos