गडचिरोलीत भूसुरुंग स्फोट घडवण्याचा कट पोलिसांनी उधळला


-  ढेका नदीच्या पुलाखाली हा भूसुरुंग पेरण्यात आला होता
विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गडचिरोली :
जिल्यातील अति दुर्गम भागतील  धानोरा तालुक्यापासून दीड किलोमीटर अंतरावर सुरुंग पेरण्यात आला होता. ढेका नदीच्या पुलाखाली हा भूसुरुंग पेरण्यात आला होता. निवडणूक अधिकारी व पोलीस दल  परततांना घातपात घडविण्याचा नक्षल्यांचा डाव  होता मात्र पोलिसांच्या सतर्कतेने  हा घातपात उधळण्यात आला आहे. यामुळे मोठी दुर्घटना टळली आहे. 
तर दुसरीकडे  जिल्ह्यातील  कसनसूर पोलीस स्टेशनच्या हद्दीत येत असलेल्या वाघेझरी येथील मतदान केंद्रावर आज सकाळी ११ च्या सुमारास नक्षल्यांनी भुसुरुंगाचा स्फोट केला. यात कुठलीही जिवीत वा वित्त हानी झालेली नाही. या केंद्रावर मतदान सुरू असताना अचानक हा स्फोट झाला. या स्फोटाच्या आवाजाने येथे उपस्थित मतदार व पोलिस जवानांत एकच खळबळ उडाली. स्फोटाच्या ठिकाणापासून अवघ्या दोन कि.मी. अंतरावर मतदान केंद्र आहे. या स्फोटामुळे जवळपासच्या मतदान केंद्रांना तातडीने अन्यत्र हलविण्यात आले. या सर्व प्रक्रियेत नागरिकांना मोठ्या प्रमाणात मनस्ताप सहन करावा लागला आहे.

   Print


News - Gadchiroli | Posted : 2019-04-11


Related Photos