महाराष्ट्राच्या शेवटच्या टोकावरील धोडराज मतदान केंद्रावर चोख पोलीस बंदोबस्तात मतदान


- भामरागड तालुक्यात दुपारी १ वाजतापर्यंत ३४.४९ टक्के मतदान 
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
मनिष येमुलवार / भामरागड :
तालुक्यातील शेवटच्या टोकावर असलेल्या धोडराज येथील मतदान केंद्रांवर दुर्गम गावांमधील मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. या मतदान केंद्रावर चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. भामरागड तालुक्यात १ वाजतापर्यंत ३४.४९ टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. अंतीम आकडेवारी लवकरच प्राप्त होईल.
धोडराज येथील जिल्हा परिषद शाळेच्या इमारतीमध्ये मतदान केंद्र ठेवण्यात आले होते. या मतदान केंद्रावर नेलगुंडा, गोंगवाडा, धोडराज, गोलगुडा, भटपर येथील मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. हे जिल्ह्यातीलच नव्हे तर राज्यातील शेवटच्या टोकावरील मतदान केंद्र आहे. या ठिकाणी चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. तालुक्यात दुपारी १ वाजतापर्यंत ७ हजार ५५४ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता.

   Print


News - Gadchiroli | Posted : 2019-04-11


Related Photos