गडचिरोली - चिमूर लोकसभा क्षेत्रात १ वाजेपर्यंत ४३.४३ टक्के मतदान


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली:
गडचिरोली - चिमूर लोकसभा क्षेत्रासाठी आज ११ एप्रिल रोजी पार पडलेल्या मतदानासाठी दुपारी १ वाजतापर्यंत ४३.४३   टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे.
गडचिरोली - चिमूर लोकसभा क्षेत्रात १५ लाख ८० हजार ७० मतदार आहेत. यामध्ये ७  लाख ९९ हजार ७४७ पुरूष आणि ७ लाख ८० हजार ३२० महिला आणि ३ इतर मतदारांचा समावेश आहे. यापैकी दुपारी १ वाजतापर्यंत ३ लाख ५० हजार ३६९ पुरूष तर ३  लाख ३५ हजार ८५१ महिला मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. गडचिरोली , आरमोरी, अहेरी आणि आमगाव विधनसभा क्षेत्रातील मतदान प्रक्रिया दुपारी ३ वाजता बंद झाली आहे. तर ब्रम्हपुरी आणि चिमूर विधानसभा क्षेत्रात सायंकाळी ६ वाजतापर्यंत मतदान करता येणार आहे.  

   Print


News - Gadchiroli | Posted : 2019-04-11


Related Photos