महत्वाच्या बातम्या

 डोळ्यांची काळजी घ्या : आरोग्य विभागाचे आवाहन


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / भंडारा : डोळे येणे (कंजक्टिवाईटीस) आजाराच्या साथी पासुन घ्यावयाची काळजी व प्रतिबंधात्मक उपाययोजना. डोळे येणे (कंजक्टिवाईटीस) हा एक प्रकारचा संसर्गजन्य रोग आहे. हा मुख्यत्वे ॲडिनो व्हायरसमुळे होतो, जो विशेषत: पावसाळयात होतो. यालाच पिंकआय असे देखील म्हणतात, कधी कधी दोन्ही डोळयांवरही त्याचा संसर्ग होतो.

लक्षणे - डोळयांना खाज, चिकटपणा, डोळयांना सूज, डोळे लालसर होण, डोळयातून पिवळा द्रव बाहेर येणे. डोळे आल्यास काय काळजी घ्याल.

डोळयांना स्वच्छ पाण्याने सतत धुवा, इतर व्यक्तींच्या रुमाल, टॉवेल, कपडे इत्यादीने आपले डोळे पुसू नये, डोळयांना सतत स्पर्श करु नये, उन्हात वापरण्यासाठी असणाऱ्या चष्म्यांचा वापर करावा, आपल्या सभोवतालचा परिसर स्वच्छ ठेवावा, कचऱ्यामुळे त्यावर माशा बसतात ज्या डोळयाची साथ पसरवतात, डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच औषधी डोळयात टाकावी.

प्रतिबंधात्मक उपाययोजना - स्वच्छता राखने, नियमित हात धुणे आणि नेहमी सारखा डोळयांना हात लाऊ नये. ज्याव्यक्तींना हा आजार झाला असेल त्या व्यक्तींनी इतरांच्या संपर्कात जाऊ नये. शाळा, वस्तीगृहे, अनाथालय अशा संस्थात्मक ठिकाणी अशी साथ आली असेल तर डोळे आलेल्या मुलांना किंवा व्यक्तींला वेगळे ठेवण्याची गरज आहे. पावसाळयामुळे चिकचिक, घरगुती माशा किंवा चिलटांचा प्रादूर्भाव असेल तर परिसर स्वच्छता आणि आवश्यक उपाययोजना कराव्यात.

आवाहन - डोळयांचा हा संसर्ग सौम्य स्वरुपाचा असला तरी या मध्ये वैद्यकिय सल्ला घेणे आवश्यक आहे. या आजाराकरीता प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र, ग्रामिण रुग्णालय च जिल्हारुग्णालय स्तरावर आवश्यक ती सर्व औषधे व उपचार उपलब्ध आहेत. तरी कोणालाही याबाबत त्रास जाणवत असल्यास तात्काळ नजीकच्या आरोग्य संस्थेत जाऊन औषधोपचार करुन घेऊन डोळयांची दृष्टी कमी होणे वां कायम दृष्टी जाणे यासारखे गुंतागुत निर्माण होण्याची वेळ येऊ देऊ नका, असे आवाहन डॉ. मिलींद सोमकुंवर जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी केले





  Print






News - Bhandara




Related Photos