महत्वाच्या बातम्या

 नोकरी करणाऱ्या महिलांसाठी वसतिगृह योजना


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / वर्धा : नोकरी करणाऱ्या महिलांसाठी सुरक्षित आणि सोईस्कर ठिकाणी राहण्याची सोय उपलब्ध व्हावी.  यासाठी शासनाने वसतीगृह योजना सुरु केली आहे. या योजनेचा नोकरी करणाऱ्या महिलांनी लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

योजनेचा लाभ घेण्यासाठी महिला अविवाहित, विधवा, घटस्फोटीत, विभक्त, विवाहीत परंतू ज्यांचे पती  किंवा जवळचे कुटुंब त्याच शहरात नाही अशा नोकरी करणाऱ्या महिलेस वसतीगृहात प्रवेश देण्यात येणार आहे. ज्या महिलेचे एकुण वार्षिक उत्पन्न ३५ हजार पेक्षा जास्त नाही अशा महिला तिच्या मुलासह वसतीगृहात राहू शकतील. तसेच नोकरी मिळविण्यासाठी प्रशिक्षण घेतल असलेल्या महिलांनाही या वसतिगृहात प्रवेश देण्यात येणार येणार आहे. नोकरी करणाऱ्या महिलेसोबत १८ वर्षापर्यंतची मुलगी व १२ वर्षापर्यंतचा मुलगा वसतीगृहात राहु शकेल. 

वसतीगृहात प्रवेश दिलेल्या नोकरी करणाऱ्या व नोकरीसाठी प्रशिक्षण घेणाऱ्या महिलेकडून सिंगल बेडरुमसाठी एकूण मासिक पगाराच्या १५ टक्के, डबल बेडरुमसाठी १० टक्के व डॉमेट्रीसाठी ७.५ टक्के पेक्षा जास्त दर घेतला जाणार नाही. जिल्ह्यात कस्तुरबा हेल्थ सोसायटी सेवाग्राम द्वारा संचालित महिला वसतीगृह सेवाग्राम येथे व मातृसेवा संघद्वारा संचालित महिला वसतीगृह रामनगर येथे असे दोन वसतीगृह आहे. वसतीगृहात प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या महिलांनी अधिक माहितीसाठी जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा, असे जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी पी.डी. विधाते यांनी कळविले आहे.





  Print






News - Wardha




Related Photos