महत्वाच्या बातम्या

 एकपाळा हनुमान मंदीर देवस्थानच्या विकास कामाला निधी कमी पडू देणार नाही : खा. रामदास तडस


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / वर्धा (देवळी) : महाराष्ट्र राज्याचे लोकप्रीय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राच्या विकासासाठी मोठे योगदान दिले आहे, त्यांच्या नेतृत्वामुळे महाराष्ट्रात विकासाची घोडदौड सुरु आहे. तसेच त्यांनी स्पष्ट निर्देश दिले होते की, वाढदिवसा निमीत्य कोणतेही बॅनर, जाहीरात करु नये, भारतीय जनता पार्टीने त्यांचा वाढदिवस सेवा दिवस म्हणून साजरा करण्याचे निश्चीत केले व आज आपण जेष्ठ नागरिकाला आवश्यक वस्तुचे वाटप केले तसेच त्यांच्या निरोगी असे दीर्घायुष्य लाभण्याकरिता आपण सर्वांनी प्रार्थना व आरती केली आहे. त्यांना उदंड दिर्घायुष लाभो ही सदिच्छा व्यक्त करतो. वयाच्या १० व्या वर्षापासून एकपाळा येथील हनुमान मंदीरात नियमीत येत असुन त्यांच्या आशिर्वादाशिवाय कोणत्याही मोठया कामाची सुरवात करीत नाही व त्यांच्या आशिर्वादामुळे मी आज खासदार आहे. त्यामुळे पर्यटन क्षेत्र असलेल्या एकपाळा हनुमान मंदीरातील विकास कामाला माझा हातभार लागत असल्यामुळे याचा आनंद होत आहे. यापुढेही येथील विकासाकामाला निधी कमी पडु देणार नाही असे प्रतिपादन खा. रामदास तडस यांनी केले. ते एकपाळा येथे विविध विकास कामांच्या भुमीपूजन प्रंसगी बोलत होते.

एकपाळा हनुमान मंदीर येथे महाराष्ट्र शासन पर्यटन विभाग अंतर्गत तिर्थक्षेत्र विकास कार्यक्रम अंतर्गत एकपाळा हनुमान मंदीर परीसरात भक्ताकरिता विविध सोईसुविधा पुरविणे व खासदार स्थानिक विकास निधी अंतर्गत पाकशाळेचे बांधकाम भुमीपूजन खा. रामदास तडस यांच्या शुभहस्ते संपन्न झाला. यावेळी जिल्हा नियोजन समिती सदस्य राजेश बकाने, एकपाळा हनुमान मंदीर समितीचे अध्यक्ष प्रकाश कारोटकर, सचिव शरदराव आदमने, दशरथ भुजाडे, रवी कारोटकर उपस्थित होते.

सर्वप्रथम महाराष्ट्र राज्याचे उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा वाढदिवस सेवा दिवस म्हणून साजरा करण्यात आला. एकपाळा ता. देवळी जि. वर्धा येथील हनुमान मंदीरात उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निरोगी असे दीर्घायुष्य लाभण्याकरिता आरती व पुजा करण्यात आली तसेच जेष्ठ नागरिकांना आवश्यक वस्तुचे वाटप करण्यात आले. 

कार्यक्रमाचे प्रास्तावीक अध्यक्ष प्रकाश करोटकार यांनी केले तर संचालन सचिव शरद आदमने व उपस्थितांचे आभार सदस्य मंगेश पिंपळकार यांनी मानले. कार्यक्रमाला एकपाळा हनुमान मंदीर समितीचे उपाध्यक्ष जमनादास टावरी, कोषाध्यक्ष गणेश लाडेकर, सदस्य किसना उगेमुगे, सदस्य राजु काकन, सदस्य रवी गायधने, सदस्य आशिष तलमले, सदस्य मंगेश महाजन, श्रीकांत येनुरकर, रवी पोटदुखे, उमेश कामडी, भिमराव कडु तसेच जेष्ठ नागरिक उपस्थित होते.





  Print






News - Wardha




Related Photos