महत्वाच्या बातम्या

 विजाभज प्रवर्गाच्या आश्रमशाळेतील कार्यरत १६६ वसतिगृह अधीक्षकांना वरिष्ठ वेतनश्रेणी लागू करा


- आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांची विधानसभेत मागणी

- लक्षवेधी प्रश्नावरील चर्चेत सहभागी होऊन केली मागणी

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
वृत्त संस्था / मुंबई : इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या राज्यातील १६६ वस्तीगृह अधीक्षकांना ४२००/- ग्रेट पे या लाभापासून वंचित ठेवण्यात आले असून हा त्यांच्यावर अन्याय आहे. त्यामूळे यासंदर्भात तातडीने निर्णय घेऊन या वसतिगृह अधीक्षकांना ४२००/- ग्रेट पे लागू करण्यात यावा अशी मागणी गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉक्टर देवरावज होळी यांनी विधानसभेत केली.

इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या आश्रम शाळांतील वसतिगृह अधीक्षकांना ग्रेट पे देण्यासंदर्भामध्ये वारंवार न्यायालयाने आदेश दिलेले आहेत. कोर्टाच्या आदेशानुसार शासनाने १५० लोकांना ग्रेड पे देण्यासंदर्भात निर्णय घेतलेला आहे. मात्र अजूनही १६६ वसतिगृह अधीक्षकांना सदर ग्रेट पे चा लाभ अद्याप मिळालेला नाही.

यासंदर्भात वारंवार कोर्टाकडून आदेश आणण्यासाठी वाट पाहिली जात आहे योग्य नाही. त्यामुळे या वस्तीगृह अधीक्षकांना लवकरात लवकर सदर ग्रेट पे चा लाभ देण्यात यावा अशी मागणी आमदार डॉक्टर देवराव होळी  यांनी विधानसभेत केली.






  Print






News - Rajy




Related Photos