जिल्हाधिकारी सिंह यांनी साधला नागरिकांशी व्हाईस कॉलव्दारे संवाद


-  मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांशीही साधला संवाद
विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी /  गडचिरोली :
गडचिरोली-चिमुर (अ.ज.) लोकसभा मतदारसंघात उद्या ११ एप्रिल रोजी मतदान होत असून या पार्श्वभुमीवर जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी जिल्ह्यातील सुमारे २.५० लक्ष नागरिकांशी मोबाईलवर व्हॅाईस एसएमएस व्दारे संवाद साधुन निर्भयपणे व कोणत्याही आमिषाला बळी न पडता मतदान करण्याचे आवाहन केले.
जिल्हाधिकारी तथा  जिल्हा  निवडणूक निर्णय अधिकारी  शेखर सिंह यांनी ४ हजार १२८ मतदान केंद्रस्तरीय अधिकारी  यांच्याशी  ९ एप्रिल रोजी  व्हाईस कॉलव्दारे संवाद साधला. मतदारांना निवडणूक आयोगाने निर्देशीत केलेल्या ११ ओळखपत्रांपैकी एक ओळखपत्र ग्राह्य धरण्यात येणार असल्याची माहितीही मतदारांपर्यंत पोहचविण्याचे निर्देशही  दिले.  व  त्यांना त्यांच्या कामाविषयी सुचना दिल्या. आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने जिल्हाधिकारी कार्यालयातून  एकाचवेळी सुमारे २.७०  लाख नागरिकांना वेळोवेळी एसएमएस पाठविण्याची सुविधा आहे.  अशाच प्रकारे व्हाईस एसएमएसचीही  सुविधा आहे.  Print


News - Gadchiroli | Posted : 2019-04-10


Related Photos