निवडणूकीच्या काळातही भामरागड तालुक्यातील नागरीक वाहत आहेत खांद्यावरून रूग्णांचे ओझे!


- कुठे गेला विकास, आरोग्य सुविधाच आहेत भकास!
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / भामरागड :
जिल्ह्यात लोकसभा निवडणूकीची धामधूम सुरू आहे. प्रचार संपला आणि छुप्या प्रचाराला प्रारंभ झाला आहे. राजकीय नेते आपल्या पारड्यात मते पाळून घेण्यासाठी रात्रंदिवस राब राब राबत आहेत. मात्र निवडणूकीच्या काळातही भामरागड तालुक्यातील नागरीक गंभीर रूग्णांसाठी आपले खांदे झिजवित असल्याचे वास्तव समोर आले आहे.
मागिल पाच वर्षात गेल्या ७० वर्षांत झाला नाही तेवढा विकास झाल्याचे सत्ताधारी सांगत आहेत. मग अत्यावश्यक सेवा असलेल्या आरोग्य सेवेचे तिनतेरा वाजले असताना कुठे गेला विकास, असे म्हणण्याची पाळी आली आहे.  निवडणूकीच्या काळात नेते, पक्षांचे कार्यकर्ते मात्र या गावांमध्ये पोहचतात. पण अत्यावश्यक असलेली रूग्णवाहिका पोहचू शकत नाही. यामुळे लोकप्रतिनिधी काय कामाचे, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
भामरागड तालुका मुख्यालयापासून २० किमी अंतरावर असलेल्या दर्भा गावातील मादा दामा वड्डे (६५) याची प्रकृती खालावल्याने त्याला खाटेवर टाकून खाद्याने वाहून रूग्णालयात आणत असल्याचे दृश्य पहावयास मिळाले. तालुका मुख्यालयापासून केवळ २० किमी अंतरावर रूग्णवाहिका पोहचू शकत नसेल तर ही शोकांतिकाच म्हणावी लागेल. तालुक्यात अनेक गावातील रूग्णांच्या नातेवाईकांना वर्षभर असेच रूग्ण पोहचवावे लागतात. यामुळे निवडणूका लढवून जिंकून येवून पाच वर्षे झोपा काढणार्या लोकप्रतिनिधींचे याकडे लक्ष जाईल काय, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. 

   Print


News - Gadchiroli | Posted : 2019-04-10


Related Photos