जांभिया गट्टाजवळ नक्षल्यांच्या स्फोटात सिआरपीएफचा जवान जखमी


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली :
उद्या ११ एप्रिल रोजी होत असलेल्या लोकसभा निवडणूकीच्या मतदानासाठी पोलिंग पार्ट्यांना पोहचवित असलेल्या सिआरपीएफच्या ताफ्यावर आयईडी स्फोट घडवून नक्षल्यांनी हल्ला केल्याची घटना आज १० एप्रिल रोजी दुपारी ३.३० वाजताच्या सुमारास घडली आहे. या घटनेत एक जवान जखमी झाल्याची माहिती प्राप्त झाली आहे.
सुनिल कुमार असे जखमी जवानाचे नाव असल्याची माहिती प्राप्त झाली आहे. उद्या निवडणूक होत असल्यामुळे जिल्ह्याच्या दुर्गम भागात कडेकोट सुरक्षा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. जिल्ह्यात विविध तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत. आज निवडणूकीच्या बंदोबस्तावर असलेल्या सिआरपीएफच्या ताफ्यावर नक्षल्यांनी स्फोट घडविला. सदर घटना जांभिया गट्टा च्या आठवडी बाजाराजवळ घडली. या घटनेनंतर अतिरिक्त फौज तैनात करून नक्षलविरोधी शोधमोहिम तिव्र करण्यात आली आहे.

   Print


News - Gadchiroli | Posted : 2019-04-10


Related Photos