महत्वाच्या बातम्या

 मणिपूर अजूनही अशांत : चुराचांदपूरमध्ये पुन्हा हिंसाचार भडकला, गोळीबार व जाळपोळीमुळे तणाव वाढला



विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

वृत्तसंस्था / मणिपूर : मणिपूरमध्ये गेल्या तीन महिन्यांपासून हिंसाचार उफाळला आहे. अजूनही मणिपूर अशांतच आहे. आता पुन्हा चुराचांदपूरमध्ये हिंसाचार भडकला आहे. या भागात गोळीबार, जाळपोळीमुळे तणाव वाढला आहे.

कुकी आणि मैतेई समाजात संघर्ष सुरू आहे. या हिंसाचारात अनेकांचा बळी गेला आहे. मणिपूरच्या चुराचांदपुरमधील कंगबई भागात रविवारी गोळीबार आणि जाळपोळीच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे या भागातील तणाव वाढला आहे.

या भागात रस्त्याच्या एका बाजूला कुकी समाज आहे. तर दुसऱ्या बाजूला मतैई समाजाचे गाव आहे. या गावांमध्ये संघर्ष उळाळत असून ते एकमेंकावर हल्ले करत आहे. रविवारी या भागात पुन्हा एकदा हिंसाचार उफाळला आहे. याआधी शनिवारीही या भागात हिंसाचार झाला होता. तोरबुंग भागात दोन गटात गोळीबार झाला. तर भागात नक्षलवाद्यांनी जाळपोळ केली असल्याचे स्थानिकांनी सांगितले.

मणिपूरमधील हिंसाचारात आतापर्यंत १५० पेक्षा जास्त जणांचा बळी गेला आहे. तसेच अनेकजण जखमी झाले आहेत. कुकी समाजाने आदिवासी एकजुटता मोर्चा काढल्यानंतर मणिपूरमध्ये हिंसाचाराला सुरुवात झाली होती. या मोर्च्यात मैतेई समाजाचा अनुसुचित जातीत समावेश करण्याच्या मागणीला विरोध करण्यात आला.

मणिपूरमध्ये ५३ टक्के मैतेई समाज असून इंफाळमध्ये त्यांची लोकसंख्या जास्त आहे. तर कुकी आणि नागा समाज ४० टक्के असून ते डोंगराळ भागात राहतात. आता पुन्हा मणिपूरमध्ये हिंसाचार उफाळल्याने मणिपूर शांत कधी होणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे.





  Print






News - World




Related Photos