महत्वाच्या बातम्या

 सुदानमध्ये टेक ऑफ करतांना विमान कोसळले : ४ सैनिकांसह ९ जण ठार


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

वृत्तसंस्था / नवी दिल्ली : गृहयुद्धाच्या आगीत धगधगत असलेल्या आफ्रिकन देश सुदानमध्ये रविवारी रात्री उशिरा विमानाचा मोठा अपघात झाला. या अपघातात ४ जवानांसह ९ जणांचा मृत्यू झाला. विमानात तांत्रिक बिघाड झाल्याने हा अपघात झाल्याचे सांगितले जात आहे.

या भीषण अपघातात एक मुलगी बचावली असून, तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

माहितीनुसार हे नागरी विमान सुदानच्या पोर्ट सुदान विमानतळावरून उड्डाण करत होते. मात्र अचानक या विमानात तांत्रिक बिघाड झाला आणि विमान टेक ऑफ करत असताना कोसळले. हा अपघात इतका भीषण होता की विमानातील ९ जणांचा जागीच मृत्यू झाला, त्यात ४ लष्करी जवानांचा समावेश आहे. मात्र, या अपघातात एका मुलीचा जीव वाचला. तिला तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले.

सुदान गेल्या १०० दिवसांपासून गृहयुद्धाच्या आगीत जळत आहे. सुदानमध्ये १५ एप्रिलपासून सशस्त्र सेना आणि त्यांचे प्रतिस्पर्धी निमलष्करी दल रॅपिड सपोर्ट फोर्स (RSF) यांच्यात युद्ध सुरू आहे. या युद्धाच्या दरम्यान, पोर्ट सुदान विमानतळाचा उपयोग प्रवासी आणि देशातून पळून जाणाऱ्या लोकांना बाहेर काढण्यासाठी केला जात आहे.

सुदानमध्ये सुरू असलेल्या गृहयुद्धाला २३ जुलै रोजी १०० दिवस पूर्ण झाले आहेत. आफ्रिकन देशाच्या आरोग्य मंत्रालयाचे म्हणणे आहे की, या युद्धात आतापर्यंत १ हजार १३६ लोकांचा मृत्यू झाला आहे. मात्र, या भागात युद्धादरम्यान काम करणाऱ्या विविध संघटनांचा दावा आहे की, मृतांचा आकडा यापेक्षा जास्त असू शकतो.





  Print






News - World




Related Photos