ॲसीड हल्ल्यातील ग्रामपरिवर्तक समाधान कस्तुरे याचा अखेर मृत्यू


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली :
मुलचेरा तालुक्यातील लगाम ग्रामपंचायतीचा मुख्यमंत्री ग्राम परिवर्तक समाधान कस्तुरे याच्यावर १४ मार्चच्या मध्यरात्री २.३० वाजताच्या सुमारास ॲसीड  हल्ला करण्यात आला होता. अखेर त्याचा उपचारादरम्यान नागपूर येथील रूग्णालयात मृत्यू झाला आहे. कस्तुरे याच्यावरील ॲसीड हल्ल्याप्रकरणी अहेरी पोलिसांनी याआधीच जिल्हा परिषदेच्या सदस्या शिल्पा राॅय यांचा पती  धर्मा राॅय याला अटक केली होती. 
समाधान कस्तुरे हा रात्री आपल्या खोलीमध्ये झोपला असताना पाच ते सहा जणांनी त्याच्या खोलीचा दरवाजा तोडून प्रवेश केला होता. त्याला पकडून त्याच्यावर ॲसीड टाकण्यात आले होते. या घटनेत समाधान कस्तुरे हा गंभीर जखमी झाला होता. घटनेची माहिती मिळताच लगामचे सरपंच मनिष मारटकर यांनी धाव घेत त्याला चंद्रपूर येथील रूग्णालयात हलविले होते. प्रकृती गंभीर असल्याने त्याला नागपूर येथील रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. अखेर त्याची मृत्यूशी झुंज संपली असून त्याचा मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे हळहळ व्यक्त केली जात आहे.

   Print


News - Gadchiroli | Posted : 2019-04-10


Related Photos