महत्वाच्या बातम्या

 राजुरा येथे अंधाधुंद गोळीबार : भाजयुमो नेत्याची पत्नी ठार तर एक जण जखमी


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / बल्लारपुर : राजुरा येथे अज्ञात इसमाने केलेल्या अंधाधुंद गोळीबारात भाजयुमो जिल्हा उपाध्यक्ष सचिन डोहे यांची पत्नी पूर्वशा हीचा जागीच मृत्यू झाला असुन अन्य एका व्यक्तीच्या पाठीला गोळी लागल्याने त्याला चंद्रपूर येथे हलविण्यात आले आहे. 

माहितीनुसार सोमनाथपूर वॉर्ड येथे राहणाऱ्या लल्ली शेरगील नामक व्यक्तीला वैयक्तिक शत्रुत्वातून मारण्यासाठी अज्ञात व्यक्ती शहरात आले होते. सदर बाब लल्ली शेरगील यांच्या लक्षात येताच तो रात्री ८ ते ८:३० च्या दरम्यान भाजयुमो जिल्हा उपाध्यक्ष सचिन डोहे यांचा घरात शिरला. तेव्हा मागावर असलेल्या मारेकऱ्यांनी त्याच्यावर अंधाधुंद गोळीबार सुरू केला. नेमक्या त्याच वेळी पूर्वशा डोहे अंगणात आल्याने त्यांना छातीत गोळी लागून त्या जागीच कोसळल्या तर लल्लीच्या पाठीला गोळी लागली.


सदर घटना लक्षात येताच घरातील मंडळींनी शेजाऱ्यांच्या मदतीने दोघानाही तत्काळ उपजिल्हा रुग्णालय राजुरा येथे दाखल केले. मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी पूर्वशा डोहे यांना मृत घोषित केले तर गंभीर जखमी असलेल्या लल्ली शेरगिल यांना चंद्रपूर येथे हलविण्यात आले. कोळसा तस्करीवर वर्चस्वासाठी गोळीबार केला असे प्राथमिक अंदाज आहे.





  Print






News - Chandrapur




Related Photos