महत्वाच्या बातम्या

 टीम इंडियाला मिळणार नवा कर्णधार : लवकरच होणार मोठी घोषणा


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

वृत्तसंस्था / नवी दिल्ली : टीम इंडियाला ऑगस्ट २०२३ मध्ये नवा कर्णधार मिळू शकतो. आयर्लंडविरुद्ध खेळल्या जाणाऱ्या तीन सामन्यांच्या टी-२० मालिकेत हिंदुस्थानी संघ नव्या कर्णधाराच्या नेतृत्वाखाली मैदानात उतरू शकतो.

टीम इंडिया सध्या वेस्ट इंडिजविरुद्ध दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळत आहे. यानंतर तीन वनडे आणि पाच टी-२० सामने खेळवले जातील. कॅरेबियन दौऱ्यानंतर लगेचच टीम इंडिया ऑगस्टच्या तिसऱ्या आठवड्यात आयर्लंडविरुद्ध तीन सामन्यांची टी-२० मालिका खेळणार आहे. दरम्यान, हार्दिक पांड्याला विश्रांती देण्यात आल्याने टीम इंडियाला नवा कर्णधार मिळण्याची अपेक्षा आहे.

रोहित शर्मा आणि हार्दिक पंड्या आयर्लंडविरुद्धच्या तीन टी-२० मालिकेत नसतील. अशा परिस्थितीत संघाचा कर्णधार कोण असणार हा मोठा प्रश्न आहे, कारण लवकरच हिंदुस्थानला श्रीलंकेला जावे लागणार आहे, कारण आशिया कप २०२३ तिथे खेळवला जाणार आहे. हिंदुस्थानचा पहिला सामना २ सप्टेंबरला पाकिस्तान विरुद्ध कॅंडी येथे होणार आहे. यामुळे वरिष्ठ खेळाडूंना विश्रांती देण्यात येणार आहे.

आता अशा परिस्थितीत, टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, सूर्यकुमार यादव आयर्लंडविरुद्धच्या तीन टी-२० सामन्यांमध्ये संघाचा कर्णधार होऊ शकतो. तो सध्या टी-२० संघाचा उपकर्णधार आहे आणि जर तो कर्णधार झाला तर जसप्रीत बुमराह उपकर्णधारपदाची जबाबदारी स्वीकारू शकतो, कारण तो १०० टक्के तंदुरुस्त होऊ शकणार आहे. त्यामुळे त्याची आयर्लंडविरुद्धच्या तीन सामन्यांच्या टी-२० मालिकेसाठी निवड केली जाऊ शकते.





  Print






News - World




Related Photos