भाजप आमदाराच्या ताफ्यावर नक्षली हल्ला, आमदाराचा मृत्यू, पाच पोलीस शहिद


- निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर  छत्तीसगडमध्ये नक्षली उद्रेक 
वृत्तसंस्था /  दंतेवाडा : 
छत्तीसगड राज्यातील  दंतेवाडा जिल्ह्यात भारतीय जनता पक्षाच्या ताफ्यावर नक्षलवाद्यांनी हल्ला केला आहे. भाजप आमदार भीमा मंडावी यांचा हा ताफा होता.  या हल्ल्यात त्यांचा मृत्यू झाला असून पाच पोलीस शहीद झाले आहेत. ११ एप्रिल रोजी येथे पहिल्या टप्प्यातील मतदान पार पडणार आहे, त्यापूर्वीच हा हल्ला झाल्याने खळबळ उडाली आहे.
 आज ९ एप्रिल रोजी  भाजप आमदार आपल्या ताफ्यासह जात असताना नक्षलावाद्यांनी आयईडी स्फोट घडवला. हा स्फोट एवढा भीषम होता की बुलेटप्रूफ गाडीच्या ठिकऱ्या उडाल्या. स्फोटानंतर नक्षलवाद्यांनी ताफ्यावर तुफान गोळीबार केला. यात पाच पोलीस शहीद झाले आहेत. हल्ल्यानंतर भाजप आमदार बेपत्ता झाले असून त्यांच्या अपहरणाची शक्यता वर्तवली जात आहे.
 याआधी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नक्षलवाद्यांनी हल्ल्याचा कट रचल्याची माहिती गुप्तचर यंत्रणांनी जवानांना दिली होती. यानंतर जवानांनी सुरक्षा व्यवस्था वाढवली होती. तरीही दंतेवाडामध्ये नक्षलवादी हल्ला झाल्याने सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत.  Print


News - World | Posted : 2019-04-09


Related Photos