महत्वाच्या बातम्या

 चंद्रपूर : भीषण अपघातात दोन विद्यार्थी ठार


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / चंद्रपूर : काल झालेल्या भीषण अपघातात दोन विद्यार्थी ठार झाले. चंद्रपूर- नागपूर महामार्गावर असलेल्या घोडपेठजवळ शुक्रवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास झालेल्या अपघातात दुचाकीस्वार दोन विद्यार्थी ठार झाले. यश दिनकर देवाळकर वय १९ वर्ष, रा. कवठाळा, कोरपना व करण सुधाकर जुलमे वय १९ वर्ष, रा. म्हातारदेवी, चंद्रपूर अशी मृतक विद्यार्थ्यांची नावे असून, दोघेही इंजिनिअरिंग कॉलेजचे विद्यार्थी होते.

मृतक यश आणि करण हे दोघेही भद्रावती तालुक्यातील लोणारा येथील साई इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये बी. टेक. प्रथम वर्षाला शिकत होते. सकाळच्या सुमारास दोघेही दुचाकी क्रमांक एम. एच. २९ - बीएन २२४२ ने कॉलेजला जात होते. यावेळी ऊर्जाग्राम व घोडपेठदरम्यान असलेल्या नायरा पेट्रोलपंप नजीक त्याच रस्त्यावरून पेट्रोल भरण्याकरिता पंपाच्या दिशेने रिव्हर्स येत असलेल्या टाटा झेस्ट क्रमांक एम. एच. ३४ एएम ६३९० या वाहनाला दुचाकीने धडक दिली. यात दोन्ही विद्यार्थ्यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेचा पुढील तपास  भद्रावती पोलीस करीत आहेत.






  Print






News - Chandrapur




Related Photos