विद्यार्थ्यांनी विकसीत केले प्रदुषण कमी करण्याचे तंत्र


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
वृत्तसंस्था / भोपाळ :
सध्या हवेच्या प्रदुषणाचा प्रश्न मोठया प्रमाणात भेडसावत आहे. परंतु वाहनामुळे होणाऱ्या हवा प्रदुषणावर नियंत्रण आणणारे एक उपकरण विकसीत करण्यात आले आहे. भोपाळमधील लक्ष्मी नारायण तंत्रज्ञान महाविद्यालयातील विद्यार्थी-शिक्षकांनी हे उपकरण विकसीत केले आहे. या उपकरणामुळे दुचाकी आणि चारचाकी वाहनांमुळे होणाऱ्या प्रदुषणावर नियंत्रण आणता येईल असा दावा त्यांनी केला आहे.
वाहनाच्या प्रदुषामुळे कार्बन डायऑक्साइड आणि इतर विषारी वायू हवेत मिसळले जातात. विद्यार्थ्यांनी ' इलेक्ट्रोस्टॅटीक गॅस प्युरिफायर डीव्हाइस'  हे उपकरण बनवले आहे. या उपकरणामुळे वाहनांतून होणाऱ्या प्रदुषणावर नियंत्रण ठेवण्यास मदत होणार आहे. विद्यार्थ्यांनी विकसित केलेल्या या उपकरणामुळे विषारी घटकांवर नियंत्रण ठेवण्यास मदत होणार असल्याचा दावा करण्यात येत आहे.
महाविद्यालयाचे सहाययक प्राध्यापक पुष्कल बदोनिया यांनी सांगितले, गेल्या वर्षभरापासून आमचे यावर संशोधन सुरू होते. यासंदर्भातील आमची दोन संशाधने आंतराष्ट्रीय जर्नलमध्ये प्रकाशित झाली आहेत. तर, या उपकरणाची पेटंट नोंदणी केली असून, लवकरच वाहनांमध्ये हे उपकरण बसवता येईल अशी माहिती संशोधकांच्या टीममधील जाॅसी जाॅर्ज यांनी दिली.  Print


News - World | Posted : 2019-04-09


Related Photos