विवाहबाह्य संबंधातून जिल्हा परिषद कर्मचाऱ्याची प्रेयसीच्या घरामध्ये गळफास घेऊन आत्महत्या


- नागपुरातील धक्कादायक घटना
विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / नागपूर
: विवाहबाह्य संबंध ठेवणाऱ्या  जिल्हा परिषद कर्मचाऱ्याने प्रेयसीच्या घरामध्ये  गळफास घेऊन आत्महत्या केल्याची  धक्कादायक घटना राणाप्रतापनगर पोलीस ठाण्यांतर्गत समोर आली आहे.  अनंत  क्रांतीकुमार मालेवार (४७) रा. अभयनगर असे आत्महत्या केलेल्या कर्मचाऱ्याचे नाव आहे. तो  जिल्हा परिषदेच्या महसूल विभागात कार्यरत होता.
 २०१५ मध्ये विमा घेताना एका महिलेसोबत त्यांची ओळख झाली. यातून त्यांच्यात मैत्री आणि मैत्रीचे प्रेमात रूपांतर झाले.  महिलेला दोन मुली आहेत.  अनंत  हा नेहमी   तिच्या घरी ये-जा करायचा. कार्यालयीन कामानिमित्त शहराबाहेर जायचे असल्याचे सांगून तो नेहमी काही दिवस प्रेयसीच्या घरी थांबायचा. रविवारीही त्याने पत्नीला कामानिमित्त बाहेर जात असल्याचे सांगितले व प्रेयसीकडे पोहोचला. त्यादिवशी प्रेयसीने त्याला जेवायला बोलावले होते.
प्रेयसीच्या मुली त्याचा राग करायच्या. या करणावरून दोघांमध्ये नेहमी वाद होत असे. रविवारीही त्यांच्यात वाद झाला. या वादानंतर त्याने प्रेयसीच्या फ्लॅटमधील एका खोलीत स्वत:ला बंद करून घेतले. यापूर्वीही त्यांच्यात असे भांडण झाले असल्याने प्रेयसी मुलींना घेऊन दुसऱ्या खोलीत झोपली. सकाळी आठ वाजल्यानंतरही अनंत उठला नाही. यामुळे  तिने दरवाजा ठोठावला. पण, आतून प्रतिसाद मिळाला नाही. तिने आपल्या भावाला   बोलावले. तिच्या भावाने इमारतीभोवती असलेल्या सुरक्षा  भिंतीवर चढून खिडकीतून बघितले असता अनंतने खोलीत ओढणीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे दिसले. त्यांनी पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी दरवाजा तोडला. त्यानंतर त्याच्या पत्नीला माहिती देण्यात आली. अनंत याला  एक मुलगा आहे.  Print


News - Nagpur | Posted : 2019-04-09


Related Photos