महत्वाच्या बातम्या

 आरमोरीतील से. नि. शिक्षक व झाडीपट्टी रंगभूमीवरील ज्येष्ठ नाट्यकलावंत नटराज गणपती वडपल्लीवार यांचे निधन


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

तालुका प्रतिनिधी / आरमोरी : आरमोरी येथील आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त सेवा निवृत्त शिक्षक तसेच राज्यात प्रसिद्ध असलेल्या झाडीपट्टी रंगभूमीवरील ज्येष्ठ नाट्यकलावंत, नटराज या नावाने  नावलौकिक असलेले गणपती वडपल्लीवार यांचे आज वयाच्या 80 व्या वर्षी वृद्धापकाळाने दुःखद निधन झाले.

कारकीर्द : 1963 ते 20१३ या कालावधीत प्राथमिक शिक्षक ते उच्च श्रेणी मुख्याध्यापक म्हणून शालेय शिक्षण  विभागात अविरत सेवा दिली. त्यांचे  विशेष कार्य  म्हणजे झाडीपट्टी रंगभूमीला वैभव व प्रतिष्ठा प्राप्त करून देण्यात त्यांनी सिंहाचा वाटा उचलला ; याच झाडीपट्टी रंगभूमीची शेवटच्या श्वाासापर्यंत सेवा करेन  असे त्यांचे अजरामर शब्द आज खरे ठरल्याचे त्यांच्या कार्याचा आढावा घेत असताना जाणवते. झाडीपट्टी नाट्य  रंगभूमीवर ७000 पेक्षा अधिक बहारदार व रसिकाना आवडणाऱ्या, रिझविणाऱ्या विविध भूमिका साकारल्या.

 महाराष्ट्र शासनाच्या शिक्षण विभाामार्फत राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार,  महाराष्ट्र शासनाच्या  प्रसिद्ध अश्या   राज्य सांस्कृतिक  पुरस्काराने गौरविण्यात आले होते. याशिवाय अन्य विभागाचे पस्तिसाहून अधिक पुरस्कार नाट्यसेवेकरिता प्राप्त  झालेले एकमेव झाडीपट्टी नाट्य कलावंत म्हणून  गौरव प्राप्त आहे.

 झाडपी माणसं , माता मायेचा मुंजा, पांढरा दुधाची काळी कथा ई. नाट्य पुस्तकावर आधारित नाटके प्रसिद्ध असून प्रेक्षक वर्ग आजही त्यांच्या नाटकांचे चाहते आहेत. विदर्भातील अशा हरहुन्नरी नाट्यकलावंतांना आमच्या समूहातर्फे भावपूर्ण श्रद्धांजली.





  Print






News - Gadchiroli




Related Photos