घोट जवळील वळणावर अपघातात छत्तीसगड राज्यातील दोन युवक ठार


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गडचिरोली :
घोट   येथुन चामोर्शीकडे जाणाऱ्या मार्गावर घोटपासून १ किलोमीटर अंतरावरील  वळणावर भरघाव दुचाकीने झाडाला धडक दिल्याने दुचाकीवरील दोन युवकांचा मृत्यू झाल्याची घटना आज ८ एप्रिल रोजी सकाळी ९ वाजताच्या सुमारास घडली. विप्लब अतूल मंडल(२४) व देबूजीत दिपंकर मंडल (१९) दोन्ही रा.जयदेवपूर (कॅम्प क्र. ८७) तालुका बांदे जिल्हा पाखांजूर,(छत्तीसगड)  अशी मृतकांची नावे आहेत.
प्राप्त माहितीनुसार विप्लब व देबुजीत हे   टिव्हीएस अपार्ची कंपनीच्या नवीन दूचाकीने छत्तीसगड  राज्यातील  आपल्या काही  सहकारी मित्रासह  मार्कंडेश्वराच्या दर्शनासाठी जात होते. सर्वच मित्र आपआपली दुचाकी वाहने भरधाव वेगाने नेत होते.  दरम्यान विप्लब व देबुजीत यांच्या भरधाव दुचाकीने रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडाला धडक दिली. या अपघातात देबूजीत मंडल जागीच ठार झाला तर विप्लब मडंल याला चामोर्शी ग्रामीण रुग्णालयात नेत असतांना त्याचा वाटेत मृत्यू झाला.या प्रकरणी घोट पोलिस मदत केंद्रात अपघाताची नोंद करण्यात आली.पुढील तपास घोट पोलिस करीत आहेत.  Print


News - Gadchiroli | Posted : 2019-04-08


Related Photos