गोंदिया जिल्ह्यातील बनाथर येथील तलाठी एसीबीच्या जाळ्यात


- रेती वाहतूकीच्या ट्रॅक्टरवर कारवाई न करण्याकरीता १० हजारांची लाच
विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गोंदिया :
रेती वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरवर कारवाई न करण्यासाठी १० हजारांची लाच स्वीकारल्याप्रकरणी गोंदिया जिल्ह्यातील बनाथर येथील तलाठ्यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकार्यांनी अटक केली आहे.
प्रफुल्ल खुशाल मेश्राम  (४०) तलाठी कार्यालय बनाथर, ता. जि. गोंदिया असे लाचखोर तलाठ्याचे नाव आहे.  तक्रारदार शेतकरी असून  ट्रॅक्टरने रेती वाहतुक करीत असतांना तलाठी प्रफुल्ल  मेश्राम यांनी ट्रॅक्टरवर कार्यवाही न करण्यासाठी  २५ हजार रूपयांची मागणी केली. त्यावेळी तक्रारदाराने तलाठी प्रफुल्ल  मेश्राम यांना नाईजलाजास्तव १५ हजार रूपये दिले होते.  उर्वरीत १० हजार रूपये तलाठी प्रफुल्ल  मेश्राम यांनी नंतर आणुन देण्यास सांगुन तक्रारदाराचे ट्रॅक्टर वर  कार्यवाही न करता सोडुन दिले. तक्रारदाराच्या रेतीच्या ट्रॅक्टरवर कार्यवाही न करता सोडुन दिल्याचा मोबदला म्हणुन तलाठी मेश्राम यांनी तक्रारदारास १० हजार रूपये लाचेची मागणी केली. तक्रारदार यांची तलाठी प्रफुल्ल   मेश्राम यांना लाच देण्याची  ईच्छा नसल्याने त्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, गोंदिया येथे तक्रार नोंदविली. तक्रारदाराने दिलेल्या तक्रारीवरून सापळा कार्यवाहीचे आयोजन केले असता सापळा कार्यवाही दरम्यान तलाठी प्रफुल्ल   मेश्राम यांनी लाचेची मागणी करून लाचरक्कम स्विकारण्याची तयारी दर्शविली. त्यावरून  आज ८ एप्रिल रोजी  पोलिस ठाणे रावणवाडी, जि. गोंदिया येथे कलम ७ लाचलुचपत प्रतिबंध (संशोधन) अधिनियम २०१८ अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. 
सदर कार्यवाही पोलीस उपायुक्त/पोलीस अधिक्षक श्रीकांत धिवरे  (अतिरिक्त कार्यभार),   अपर पोलिस अधीक्षक राजेश दुद्दलवार यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपअधिक्षक रमाकांत कोकाटे, पोलिस हवालदार प्रदिप तुळसकर, राजेश शेंद्रे, ना.पो.शि. रंजित बिसेन, डिगांबर जाधव, नितीन रहांगडाले, राजेंद्र बिसेन, महिला नायक पोलिस शिपाई वंदना बिसेन व चालक नायक पोलिस शिपाई देवानंद मारबते आदींनी केली आहे.

   Print


News - Gondia | Posted : 2019-04-08


Related Photos