गडचिरोली जिल्ह्यात मतदान केंद्रांच्या ठिकाणी १४४ कलम लागू


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गडचिरोली : 
गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदार संघाच्या  सार्वत्रिक निवडणूकीकरिता  ११  एप्रिल  रोजी मतदान प्रक्रिया घेण्यात येत आहे. 
ही  निवडणूक  भयमुक्त व शांततापुर्ण वातावरणत पार पाडण्यासाठी  गडचिरोली-चिमूर  लोकसभा मतदारसंघातील गडचिरोली जिल्हयातील सर्व 935 अधिसूचित (Notified) मतदान केंद्राच्या  १०० मिटरच्या परिसरात फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ चे कलम १४४ अन्वये प्रतिबंधात्मक आदेश निर्गमित करण्यात आले आहेत.
या कलमान्वये मतदान केंद्रात प्रवेश करतेवळी पाच पेक्षा जास्त व्यक्ती ( निवडणूक संबंधित अधिकारी व कर्मचारी वगळून ) एकत्रिरित्या प्रवेश करणार नाहीत , मतदान केंद्राच्या १०० मिटरच्या परिसरात सार्वजनिक सभा घेता येणार नाही, मतदान केंद्राचे परीसरात मतदानाचे कालावधीत ध्वनी प्रक्षेपण ( loudspeaker) करणार नाही.  मतदान केंद्राचे परीसरात कोणत्याही प्रकाराच्या घोषणा देता येणार नाहीत. मतदान केंद्राच्या  परिसरात अन्य व्यक्तीकडून शांततेस बाधा निर्माण होईल असे कृत्य करण्यात येणार नाही. मतदान केंद्रावर कोणत्याही अनधिकृत व्यक्तीस /वाहनास प्रवेशास मनाई राहील. मतदान केंद्राच्या १०० मिटरच्या परिसरात कोणत्याही राजकीय पक्षास किंवा त्यांच्या  कार्यकर्त्यास प्रचार व प्रसार करता येणार नाही.
हे आदेश मतदान केंद्रावर काम करणारे अधिकारी/ कर्मचारी, मतदान केंद्रावर निगराणी करणारे अधिकारी, पोलीस अधिकारी व कर्मचारी यांचेबाबत त्यांचे कर्तव्ये पार पाडण्याचे अनुषंगाने लागू राहणार नाहीत. आदेश ९ एप्रिल च्या  दुपारी ३  वाजेपासून ते ११ एप्रिल च्या  रात्री १२  वाजेपर्यंत संबंधित मतदान केंद्राच्या  ठिकाणी अंमलात राहील, असे जिल्हादंडाधिकारी यांनी कळविले आहे.  Print


News - Gadchiroli | Posted : 2019-04-08


Related Photos