जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी शेखर सिंह यांचा मतदान केंद्र अधिकाऱ्यांशी व्हाईस एसएमएसद्वारे संवाद


- मतदान प्रक्रियेबाबत दिल्या सुचना
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली :
गडचिरोली - चिमूर लोकसभा निवडणूकीचे प्रशासनातर्फे योग्य व अचुक नियोजन केल्या जात असून नवनवीन तंत्रज्ञानाच्या वापरावर भर दिल्या जात आहे. मतदारांच्या जनजागृतीसोबतच मतदान केंद्र अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसोबतही जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी शेखर सिंह हे नेहमी संपर्कात आहेत. त्यांनी आज ८ एप्रिल रोजी व्हाईस एसएमएसद्वारे जिल्ह्यातील सर्व मतदान केंद्र अधिकाऱ्यांशी संवाद साधला.
मतदान केंद्र अधिकारी व कर्मचाऱ्यांना निवडणूक विभागाच्या सुचना तातडीने पोहचाव्यात यासाठी एकाच वेळी अनेक अधिकाऱ्यांपर्यंत एसएमएस पोहचेल अशी व्यवस्था करण्यात आली आहे.  व्हाईस एसएमएसद्वारे अधिकाऱ्यांशी संवाद साधला जात  आहे. 
११ एप्रिल रोजी मतदान प्रक्रिया पार पाडली जाणार आहे. यासाठी मतदान केंद्र अधिकारी, कर्मचाऱ्यांना उद्या ९ मार्चपासून दिलेल्या स्थळावर पोहचायचे आहे. याबाबतच्या सुचना वेळोवेळी अधिकाऱ्यांना दिल्या जात आहेत. प्रशासनाने निवडणूकीसाठी जय्यत तयारी केली आहे. निवडणूकीत मतदारांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, मतदारांनी कोणत्याही आमिषाला बळी पडून मतदान करू नये, याबाबतही प्रशासन जनजागृती करीत आहेत. एकंदरीत निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी शेखर सिंह यांच्या मार्गदर्शनात निवडणूक विभागाचे काम जलदगतीने सुरू आहे. 

   Print


News - Gadchiroli | Posted : 2019-04-08


Related Photos