... बाई भाषण ऐकण्याचे १०० मिळतात !


- शहरातील महिलांमध्ये चर्चा, उन्हाच्या दिवसात कुठे मिळतात शंभर?
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली :
सध्या लोकसभा निवडणूकीच्या प्रचाराचा हंगाम सुरू आहे. काॅर्नर सभा, स्टार प्रचारकांच्या सभा, कार्यकर्ते, उमेदवारांकडून मतदारांच्या भेटीगाठी सुरू आहेत. अशातच सभांना गर्दी करण्यासाठी महिलांना पक्षाचा झेंडा, दुपट्टा आणि सोबतच १०० रूपये मिळत असल्याने, बाई भाषण ऐकण्याचे शंभर मिळतात, चला! असे ऐकावयास मिळत आहे.
गडचिरोली शहरातील काही भागातील महिलांमध्ये अशीच चर्चा रंगलेली पहायला मिळाली. पाच - दहा महिला कार्यकर्त्या आपआपल्या वार्डातील महिलांसोबत चर्चा करतात, आमच्या पक्षाच्या सभेला चला, शंभर रूपये देऊ अशी डील केली जात आहे. उद्या दुसऱ्या पक्षांच्या महिला कार्यकर्त्या त्याच महिलांना परत शंभर रूपये देवून आपल्या सभेकडे गर्दी करण्याचा प्रयत्न करताना दिसून येत आहे. यामुळे ‘तुमचे चालू द्या, आमचे शंभर आम्हाला द्या’ असे चित्र पहायला मिळत आहे. सध्या गल्लीबोळात कार्यकर्ते फिरून सभेसाठी उपस्थित राहण्याचे शंभर रूपये, एक टी शर्ट, पक्षाचा झेंडा, दुपट्टा वाटप करताना दिसून येत आहे. यामुळे मतदारांचेही चांगलेच मनोरंजन होतांना दिसून येत आहे.

   Print


News - Gadchiroli | Posted : 2019-04-08


Related Photos