वाघाच्या हल्ल्यात बैल ठार, कृष्णार येथील घटना


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / भामरागड :
भामरागड वनपरीक्षेत्रांतर्गत येत असलेल्या कृष्णार येथे वाघाने दहशत माजविली असून वाघाने बैलाला ठार केल्याची घटना ४ एप्रिल रोजी घडली.  सदर बैल लालु चुकलू कुडयामी यांच्या मालकीचा होता. यामुळे त्यांचे आर्थिक नुकसान झाले आहे.
बैल जंगलात चरण्यासाठी गेला होता. मात्र तो परत आलाच नाही. ५ एप्रिल रोजी शोध घेतला असता जंगलात बैलाचे अवशेष आढळून आले. घटनेची माहिती भामरागड वनपरीक्षेत्र कार्यालयात देण्यात आली. घटनेची चैकशी करून नुकसानभरपाई देण्याची मागणी लालु कुडयामी यांनी केली आहे.
याबाबत वनपरीक्षेत्र अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता तक्रार प्राप्त झाली असून कृष्णार बिटचे वनपाल सुरेश गोहणे, वनरक्षक स्मिता गोंगले यांना मोका पंचनामा करण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत. नेमके वाघानेच बैलाला ठार केले असे म्हणाता येत नाही. कारण वाघाची कोणतीही हालचाल नाही. या परिसरात बिबट्याचा वावर असून बैलाला बिबट्याने ठार केले असावे. पंचनामा करून मदत दिली जाईल, असे सांगितले.

   Print


News - Gadchiroli | Posted : 2019-04-08


Related Photos