वाकडी येथील युवकाची विष प्राशन करून आत्महत्या


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
शहर प्रतिनिधी / गडचिरोली :
जिल्हा मुख्यालयापासून ६ किमी अंतरावर असलेल्या वाकडी येथील युवकाने विष प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना ७ एप्रिल रोजी रात्री ११ वाजताच्या सुमारास घडली.  
  प्रजोत भोयर  (२१) असे आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव आहे. विष  प्राशन केल्याचे कळताच त्याला  गडचिरोली येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. त्याने आत्महत्या का केली याचे कारण कळू शकले नाही. पुढील तपास गडचिरोली पोलीस करीत आहेत.    Print


News - Gadchiroli | Posted : 2019-04-08


Related Photos