कार्यकर्त्यांना मिळतो निवडणूकीपुरता मान, तरीही करताहेत जीवाचे राण!


- आपल्या उमेदवाराला वरचढ दाखविण्यासाठी कार्यकर्त्यांमध्ये चढाओढ
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली :
राजकारण म्हटले की, विविध राजकीय पक्षांना यश मिळवून देण्यासाठी विविध भागात झटणारे कार्यकर्ते महत्वाची भूमिका निभावतात. मात्र सध्याच्या काळात या कार्यकर्त्यांना उमेदवार आणि नेते मंडळींकडून फक्त निवडणूकीपुरताच मान मिळत असल्याचे दिसून येत आहे. तरीही हे कार्यकर्ते इमाने इतबारे जीवाचे राण करीत आपला उमेदवार वरचढ दाखविण्याचा प्रयत्न करीत आहेत.
निवडणूक झाल्यानंतर व उमेदवार निवडून आल्यानंतर अनेक कार्यकर्ते तक्रारी करीत असतात. निवडणूक जिंकून दिल्यामुळे साहेब आमची कामे करतील अशी भोबडी आशा त्यांना असते. मात्र त्या आशा - अपेक्षा पुढील निवडणूक येईपर्यंत कोणीही विचारात घेत नाहीत. यामुळे अनेकदा हे कार्यकर्ते उघडपणे नाराजी बोलून दाखवितात. 
निवडणूकीच्या कालावधीत उमेदवार, पक्षश्रेष्ठींकडून कार्यकर्त्यांना खूश ठेवण्याचा प्रयत्न केला जातो. विविध पदे बहाल केली जातात. वाहने दिली जातात. मोठ्या हाॅटेलांमध्ये जेवन मिळते, खर्चासाठी पैसा मिळतो, काही आंबटशौकीन कार्यकर्त्यांच्या  दिल्ली , मुंबई अशा वाऱ्यासुध्दा होतात. मात्र निवडणूकीनंतर हे चित्र उलट होते. लोकप्रतिनधी आपल्याच तालात वावरतात. कार्यकर्ते दुर्लक्षित होतात. स्वतःच मर्जीतील लोकांना घेवून दिल्ली - मुंबईच्या वाऱ्या करतात. मर्जीतील लोकांना कामे दिली जातात. लहान - मोठ्या निवडणूकांसाठी उमेदवारी दिली जाते. जवळच्या महिला किंवा पुरूष कार्यकर्त्याला खूश केले जाते अशावेळी नाराज झालेले दुसरे कार्यकर्ते उघडपणे आतील - बाहेरील मुद्दे चव्हाट्यावर आणत असतात. जिल्हयात अशी परिस्थिती अनेकदा निदर्शनास आली आहे.
सध्या सोशल मिडीयावरील विविध पक्षांच्या तसेच इतरही व्हाट्सअप गृपवर, फेसबुक, इन्टाग्राम तसेच अन्य माध्यमांवर कार्यकर्त्यांचा जोर पहायला मिळत आहे. वेगवेगळ्या पोस्ट फिरविणे, कार्टून, फोटो, बॅनर, पोस्टर शेअर करणे, विरोधी उमेदवाराच्या वयक्तीक गोष्टी फिरविणे, प्रचार सभांमध्ये कोणत्या पक्षाला किती नगारीक उपस्थित होते, कोणाची सभा फ्लाॅप झाली, या सर्व गोष्टी फिरवून आपला उमेदवार वरचढ दाखविण्याचा प्रयत्न कार्यकर्ते करीत आहेत. मात्र निवडणूक झाली आणि निवडून आल्यानंतर हेच कार्यकर्ते दूर्लक्षीत होतात. केवळ मर्जीतील लोकांनाच स्थान मिळते. यामुळे सुज्ञ मतदार अशा कार्यकर्त्यांच्या धावपळीवरसुध्दा खमंग चर्चा करताना दिसून येत आहेत.  Print


News - Gadchiroli | Posted : 2019-04-07


Related Photos