उन्ह कडक, प्रचार थंड !


- ग्रामीण भागात दिसेनात पक्षांच्या प्रचारगाड्या
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली :
अनुसूचित जमाती प्रवर्गासाठी राखीव असलेल्या गडचिरोली - चिमूर लोकसभा क्षेत्रात पाच उमेदवार निवडणूकीच्या रिंगणात आहेत. असे असले तरी दोनच उमेदवारांमध्ये तगडी लढत होणार असून निवडणूकीचे चित्र स्पष्ट झाले आहेत. सर्वच पक्षांचे प्रचार सुरू आहेत. मात्र उन्हाच्या कडाक्याने पाहिजे त्या प्रमाणात प्रचार तोफा गरम नाहीत. ग्रामीण भागातील चित्र पाहिल्यास 'उन्ह कडक आणि प्रचार थंडच', अशी परिस्थिती निदर्शनास येत आहे.
सध्या तापमान ४० अंश सेल्सिअस हून अधीक आकडा पार करीत आहे. अंगाची लाही - लाही होत असताना सकाळी १० वाजतापासून गावे शांत होत आहेत. यामुळे प्रचार करणारे कार्यकर्ते सुध्दा पंखे, कुलर लावून झोपी जात असावे, असे चित्र निदर्शनास येत आहे.
निवडणूक म्हटली की, मतदारांचे मतपरिवर्तन ही मोठी बाब आहे. ग्रामपंचायत, पंचायत समिती असो जिल्हा परिषद असो की विधानसभा, लोकसभेची निवडणूक असो, सर्वच निवडणूकांमध्ये आपआपल्या पक्षांचे कार्यकर्ते, उमेदवार मतांचा जोगवा मागण्यासाठी दिवसरात्र एक करतात. मात्र २०१९ ची लोकसभा निवडणूक गडचिरोली - चिमूर लोकसभा क्षेत्रातील मतदारांसाठी थंडच असल्याचे दिसून येत आहे. ग्रामीण भागातील मतदारांसोबत संवाद साधल्यास कुणी पण येउ द्या, आमचे काय होणार, वेळेवर बघू कुणाला द्यायचे तर, अशी वाक्ये ऐकावयास मिळत आहेत. एकंदरीत ग्रामीण भागातील चित्र बघता विद्यमान लोकप्रतिनिधी आणि आगामी निवडणूकीसाठी उभ्या असलेल्या उमेदवारांबद्दल मतदार नाराजीचाच सूर काढताना दिसून येत आहेत. ग्रामीण भागात प्रचाराच्या बाबतीत बघितल्यास कोणत्याही पक्षांची वाहने किंवा कार्यकर्ते फिरताना दिसून येत नाहीत. केवळ गावा - गावातील सबंधित पक्षांच्या कार्यकर्त्यांनी आपआपल्या घरासमोर पक्षांचे झेंडे, बॅनर बांधून आपण पक्षासोबत आहेत हे दाखविण्याचा प्रयत्न केला आहे. काॅंग्रेस , भाजपा वगळता इतर तीन उमेदवारांची प्रचार पत्रके, बॅनर मोजकेेच आढळून येत आहेत. यामुळे गडचिरोली - चिमूर लोकसभा क्षेत्राची निवडणूक म्हणजे केवळ 'मतदान करू आणि निकालाकडे लक्ष देऊ'  अशीच असल्याचे दिसून येत आहे. 

   Print


News - Gadchiroli | Posted : 2019-04-07


Related Photos