महत्वाच्या बातम्या

 समृद्धी महामार्गावर झालेल्या भिषण अपघाताचा प्रश्न लोकसभेत


- खासदार रामदास तडस यांनी नियम ३७७ अंतर्गत उपस्थित केला प्रश्न

- समृध्दी महामार्गावर झालेल्या भिषण अपघातात मृत्युमुखी पडलेल्या निष्पाप लोकांच्या  मृत्यूस कारणीभूत  वाहन  चालक सहीत वाहन मालकावर कार्यवाही करावी.

- केंद्र सरकारने रस्ते अपघात कमी करण्यासाठी आवश्यक कठोर कायदे करून देशात चांगल्या ड्रायव्हिंग स्कूलची उभारणी करावी.

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / वर्धा : समृद्धी महामार्ग वर झालेल्या भिषण अपघातात विदर्भ ट्रॅव्हल्समध्ये प्रवास करणा-या एकूण २५ निष्पाप प्रवाश्याचा जिवंत जळून दुर्दैवी अंत झाला आहे, ज्या मध्ये २ वर्षाच्या चिमुकलीसह नवतरुण, तरुणी वर्धा जिल्हयातील १४ व्यक्तीचा समावेश आहे. सदर अपघाताने सम्पूर्ण महाराष्ट्र दुःखाने होरपळून निघाला आहे. सदर घटनेला अनेक दिवसांचा कालावधी लोटला असतानाही प्रत्यक्ष/अप्रत्यक्ष आरोपींवर काय कार्यवाही होत आहे याची कोणत्याही प्रकारची माहिती नसल्यामुळे  प्रवासात २५ मृत्युमुखी झालेल्या परीवारातील सदस्यांनी खासदार रामदास तडस यांची जनसंपर्क कार्यालय वर्धा येथे भेट घेऊन समृध्दी महामार्गावर झालेल्या भिषण अपघातात मृत्युमुखी पडलेल्या निष्पाप लोकांच्या मृत्यूस कारणीभूत वाहन चालक सहीत वाहन मालकावर सदोष मनुष्य वधाच्या गुन्हा दाखल करुन तसेच विदर्भ टॅव्हल्सचा परवाना रद्द मागणी केली होती व लोकसभेत प्रश्न उपस्थित करण्याची विनंती केली होती. त्या अनुषंगाने आज खासदार रामदास तडस यांनी लोकसभेत नियम ३७७ अंतर्गत समृद्धी महामार्ग वर झालेल्या भिषण अपघाताचा विषय उपस्थित करुन लोकसभेचे लक्ष वेधले

नागपूरहून पुणे येथे जाणा-या समृद्धी महामार्ग द्रुतगती मार्गावर महाराष्ट्रातील बुलढाणा जिल्ह्यातील पिंपळखुटा गावाजवळ विदर्भ ट्रॅव्हल्सच्या चालकाच्या चुकीमुळे मोठा अपघात झाला. या अपघातात बसला आग लागल्याने २५ प्रवाशांचा मृत्यू झाला असून त्यात वर्धा जिल्ह्यातील १४ प्रवासी आणि एका २ वर्षीय मुलीचा समावेश आहे. या घटनेला वाहन चालक आणि ट्रॅव्हल्स मालकही थेट जबाबदार आहेत, या घटनेला जबाबदार असलेल्या वाहन चालक व ट्रॅव्हल्स मालकावर कारवाई करण्यात यावी, जेणेकरून अशा प्रकारची घटना पुन्हा घडू नये, तसेच केंद्र सरकारने रस्ते अपघात कमी करण्यासाठी आवश्यक कठोर कायदे करून देशात चांगल्या ड्रायव्हिंग स्कूलची उभारणी करण्यात यावे, अशी लोकसभेच्या माध्यमातून केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री यांना खासदार रामदास तडस यांनी विनंती केली.

देशात मोठया प्रमाणात दर्जेदार रस्ते होत असुन अपघाताचे प्रमाण मोठया प्रमाणात वाढत आहे, रस्त्यावरील अपघातात वाढ होत असल्यामुळे समृध्दी महामार्ग सोबत लांब पल्ल्याच्या महामार्गावर १०० किमी अंतरावर स्टॉपेज देणे, तसेच लांब अंतरावरील प्रवास करणा-या बसेस किंवा ट्रॅव्हल्स प्रवास करावयाच्या अगोदर गाडयांच्या सुरक्षेची तपासनी करणे आवश्यक आहे व ट्रॅव्हल्स बरोबरच चालकांची सुध्दा योग्य तपासनी करणेही तेवढेच महत्वाचे आहे, समृध्दी महामार्गावर झालेल्या भिषण अपघातात मृत्युमुखी पडलेल्या निष्पाप लोकांच्या  मृत्यूस  कारणीभूत  वाहन  चालक सहीत वाहन मालकावर सदोष मनुष्य वधाच्या गुन्हा दाखल करुन तसेच विदर्भ टॅव्हल्सचा परवाना रद्द करण्याची करणे आवश्यक आहे, तसेच केन्द्रसरकार व राज्यसरकारने वाढते अपघात लक्षात घेता आवश्यक उपाययोजना दर्जेदार ड्रायव्हिंग स्कूलची उभारणी करावी असे यावेळी खासदार रामदास तडस म्हणाले. 





  Print






News - Wardha




Related Photos