महत्वाच्या बातम्या

 वनविभागाच्या वतीने रत्नापूर वनक्षेत्रात मानव - वन्यजीव संघर्ष टाळण्यासाठी जन जागृती अभियान


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / सिंदेवाही : सिंदेवाही तालुक्यात खरीप हंगाम सुरु आहे .सगळीकडे भात रोवणीचा हंगाम सुरु आहे. जंगलच्या शेतशिवरात जात असताना वाघ ह्ल्ला घटनेपासून बचाव व्हावा यासाठी वनविभाग सतर्क झाला असून  ब्रम्हपुरी वनविभागात मानव वन्यजीव संघर्षाच्या घटना होऊ नये याकरीता सिंदेवाही परिक्षेत्रातील नवरगाव उपक्षेत्रातील रत्नापुर नियत क्षेत्रामध्ये मानव वन्यजिव संघर्ष यावर मार्गदर्शन व जनजागृती करण्यात आली.

जंगल परिसराला लागून असलेल्या शेतशिवार परिसरात जात असतांना अथवा  शेतामध्ये काम करत असतांना घ्यावयाची काळजी, गुराख्याने जंगल परिसरात गुरे नेल्यावर घ्यावयाची दक्षता, गावात वन्यप्राणी दिसल्यास ध्यावयाची काळजी याबाबत दक्षता घेण्याबाबत गावकरी, शेतकरी तसेच गुराख्यांना जनजागृतीपर माहीती सिंदेवाही वनपरिक्षेत्र अधिकारी व्हि.ए. सालकर यांचे मार्गदर्शनात नवरगाव क्षेत्रसहाय्यक एस. बि. उसेंडी व वनरक्षक जे. एस. वैद्य यांनी दिली.





  Print






News - Chandrapur




Related Photos