कापसाच्या दरात वाढ, पण फायदा व्यापाऱ्यांना


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी /  चंद्रपूर
: मार्च एंडिगनंतर कापसाचे दर  ८०० रुपयांनी वाढले असून सद्या कापूस सहा हजार २०० रुपये प्रती क्विंटलवर पोहोचला आहे.   मात्र या वाढीचा  लाभ शेतकऱ्यांना होण्याऐवजी व्यापाऱ्यांनाच होत आहे. 
चंद्रपूर आणि गडचिरोली  जिल्ह्यातील काही तालुक्यांमध्ये कापसाचे उत्पादन घेतले जाते. मात्र दर अत्यल्प असल्याने शेतकरी चिंतातूर होते. अशातच त्यांनी आपल्या जवळील कापूस विकला असताना आता काही प्रमाणात कापसाचे दर वाढले आहे.  शेतकऱ्यांच्या घरातील कापूस संपताच बाजारपेठेत कापसाचे दर वाढण्यास सुरुवात झाली. कापसाचे दर तूर्तास सहा हजार रुपये क्विंटलच्यावर पोहचले आहेत. या दरात आणखी किती वाढ होते, याकडे व्यापाऱ्यांचे लक्ष लागले आहे. सामान्य शेतकऱ्यांनी यापूर्वीच कापसाची विक्री केली आहे. बहुतांश कापूस व्यापाऱ्याजवळच साठवून आहे. त्यांनाच या वाढीव दराचा लाभ होत होत आहेत. 
काही मोजक्याच शेतकऱ्यांकडे आता कापूस साठवून आहे. हे प्रमाण अत्यंत कमी आहे. यामुळे गुढीपाडव्यापर्यंत कापूस दर काय राहतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.   Print


News - Chandrapur | Posted : 2019-04-05


Related Photos