अकोला, अमरावतीत सर्वाधिक तापमान


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / अमरावती : 
मध्यप्रदेश, गुजरात व राजस्थान कडील  उष्ण वाऱ्यांमुळे अमरावती व अकोल्यातील तापमानात वाढ झाली असून  गुरुवारी  महाराष्ट्रातील अन्य शहरांच्या तुलनेत अकोला व अमरावतीत सर्वाधिक तापमानांची नोंद झाली आहे. अमरावतीत ४३.८, तर अकोल्यात ४४ डिग्री सेल्सिअस तापमान आहे. 
शुक्रवारनंतर उष्णतेची लाट ओसरणार असून, पश्चिम विदर्भ ते मध्य महाराष्ट्र, कर्नाटकपर्यंत कमी दाबाच्या स्थितीमुळे पूर्व विदर्भात आज वादळी पावसाची शक्यता आहे. शिवाजी कृषी महाविद्यालयाचे हवामान तज्ज्ञ अनिल बंड यांनी वर्तविलेल्या अंदाजानुसार, सद्यस्थितीत अमरावती जिल्ह्यात पश्चिमेकडून वारे वाहत आहे. उष्ण वाऱ्यामुळे अमरावतीच्या तापमानाने उच्चांक गाठला आहे. बुधवारी अमरावतीत ४३.८ डिग्री सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. गुरुवारीही तीच नोंद कायम राहिली. शुक्रवारनंतर उष्णतेची लाट ओसरणार असून, कमाल तापमान थोडे कमी होण्याची शक्यता आहे.   Print


News - Rajy | Posted : 2019-04-05


Related Photos