नदीपात्रात आंघोळ करीत असताना मूकबधिर बालकाचा बुडून मृत्यू


- तुमनूर चेक नदीघाटावरील घटना
विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / सिरोंचा  :
  नदीपात्रात आंघोळ करीत असताना खोल पाण्यात गेल्याने बालकाचा  बुडून मृत्यू झाल्याची घटना आज ५ एप्रिल रोजी सकाळी ९ ते १० वाजताच्या सुमारास सिरोंचा तालुक्यातील तुमनूर चेक येथील  गोदावरी नदीघाटावर घडली. राजेशवंत समय्या मोते रा. तुमनूर चेक असे मृतक बालकाचे नाव आहे. राजेशवंत हा जन्मापासून मूकबधिर होता. त्याचे वडिलसुध्दा ऐकू शकत नाही.
 राजेशवंत हा आज सकाळच्या सुमारास आपल्या कुटुंबासोबत गोदावरी नदीवर आंघोळीसाठी गेला होता. दरम्यान नदीपात्रात आंघोळ करीत असताना तो खोल पाण्यात गेल्याने त्याचा बुडून मृत्यू झाला. सदर बाब कुटुंबाच्या लक्षात येताच, कुटुंबियांनी आरडाओरड केली. त्यामुळे नदीलगत असलेल्या नागरिकांनी नदीपात्रातील पाण्यात उतरून बालकाला शोधले.  घटनेची माहिती मिळताच तुमनूरचे उपसरपंच किरण वेमुला यांनी बालकाला आपल्या वाहनामध्ये टाकून सिरोंचा ग्रामीण रूग्णालयात नेले. मात्र पाण्यात बुडून खूप वेळ झाल्याने डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.  मुलाचा मृत्यू झाल्याने आाईवडिलांवर संकट कोसळले आहे.  Print


News - Gadchiroli | Posted : 2019-04-05


Related Photos