काँग्रेस उमेदवार दारू व्यवसाय करतो म्हणत चंद्रपूर दारूबंदीच्या प्रणेत्या पारोमिता गोस्वामी यांचा भाजपला पाठिंबा


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी /  चंद्रपूर : 
 शिवसेनेला सोडचिट्ठी देऊन काँग्रेस कडून लोकसभेचे उमेदवार म्हणून उभे असलेले  बाळू धानोरकर हे दारू व्यवसाय करतात , असा आरोप करून चंद्रपूर दारूबंदीच्या प्रणेत्या पारोमिता गोस्वामी यांनी आज भाजपला पाठिंबा जाहीर केला. पत्रकार परिषद घेऊन त्यांनी ही घोषणा केली.
बाळू धानोरकर हे दारू विक्रेते असल्यानं त्यांना निवडून देऊ नका, असा प्रचार विरोधकांनी सुरू केला आहे. दुसरीकडे भाजप उमेदवार हंसराज अहीर हे पूर्वी दुधाचा व्यवसाय करायचे. त्यावरून दारुवाला की दूधवाला, अशी चर्चा समाजमाध्यमांत सुरू आहे. ही चर्चा सुरू असतानाचच पारोमिता गोस्वामी यांनी काँग्रेस उमेदवारावर निशाणा साधत भाजपला पाठिंबा दिला आहे. ‘यवतमाळ जिल्ह्यातील दोन विधानसभा क्षेत्र चंद्रपूर लोकसभेत येतात. यवतमाळ जिल्ह्यात सध्या दारूबंदीचं आंदोलन सुरू आहे. याच जिल्ह्यात धानोरकर यांचंही दारूचं दुकान आहे. ते निवडून आल्यास दारुबंदीच्या आंदोलनाला विरोध होऊ शकतो, अशी शक्यता व्यक्त करत पारोमिता गोस्वामी यांनी पत्रकार परिषद घेत धानोरकरांना जाहीर विरोध केला. या पत्रपरिषदेला यवतमाळ जिल्ह्यातील महिलांना आणलं गेलं होतं.  Print


News - Chandrapur | Posted : 2019-04-05


Related Photos