काटेपल्ली येथे दोन दुचाकींची धडक , दोघे गंभीर जखमी


-  जि.प. उपाध्यक्ष कंकडालवार यांनी घेतली जखमींची भेट    
विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / अहेरी :
तालुक्यातील काटेपल्ली येथे दोन दुचाकींची धडक बसल्याने दोघे जण गंभीर जखमी झाले. दोघांनाही अहेरी येथील उपजिल्हा रुग्णालयात प्राथमिक उपचार केल्यानंतर चंद्रपूर येथे हलविण्यात आले आहे.   गणेश मडावी , शेखर पेकटीवार रा. काटेपल्ली अशी जखमींची नावे आहेत. 
 घटनेची माहिती मिळताच जिल्हा परिषद उपाध्यक्ष अजय  कंकडालवार यांनी रुग्णवाहिकेला   संपर्क साधून उपचारासाठी पाठविले. गणेश मडावी व शेखर पेकटीवार दोघेही  गंभीर जखमी असल्याने जिल्हा परिषद उपाध्यक्ष कंकडालवार  यांनी अहेरी उपजिल्हा रुग्णालयात  भेट दिली. पुढील  उपचारासाठी चंद्रपूर येथे हलविण्यात आले आहे.  यावेळी लक्ष्मण सडमेक, लालूसाई आत्राम , महेश झाडे, रामू गावडे , रामदास झाडे,  किशोर शंभरकर,  प्रकाश दुर्गे व आविस कार्यकर्ते उपस्थित होते.   Print


News - Gadchiroli | Posted : 2019-04-05


Related Photos